सोलापूर : खेलो इंडिया युथ गेम्स राज्य खो खो स्पर्धेत 18 वर्षाखालील मुलींच्या गटात वाडीकुरोलीच्या (ता. पंढरपूर) वसंंतराव काळे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाने उपविजेतेपद संपादिले.
महाळुंगे – बालेवाडी, पुणे येथे झालेल्या या स्पर्धेत लातूर विभागाच्या उस्मानाबादबरोबर झालेल्या अंतिम सामन्यात कडव्या लढतीनंतर वाडीकुरोलीचा पराभव झाला. प्रीती काळे , अमृता माने , साक्षी काळे , रोहीणी काळे , संध्या सुरवसे , शिवानी येड्रावकर , भाग्यश्री काळे , आरती काळे , प्रणाली काळे , श्वेता भोसले , साक्षी देठे व अमृता सुरवसे हे या संघातील खेळाडू आहेत.
संघास राज्य क्रीडा मार्गदर्शक सत्येन जाधव , क्रीडाशिक्षक प्रा. संतोष पाटील व प्रशिक्षक अतुल जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.
त्यांचे सोलापूर खो-खो असोशिएशनचे अध्यक्ष महेश गादेकर , श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कल्याणराव काळे, क्रीडाधिकारी नितीन तारळकर, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त श्रीकांत ढेपे, असोसीएशनचे खजिनदार श्रीरंग बनसोडे , सचिव सुनिल चव्हाण, संस्थेचे सचिव बाळासाहेब काळे , क्लबचे मार्गदर्शक विलासराव काळे , कल्याणराव काळे स्पोर्टस् क्लबचे अध्यक्ष समाधान काळे, प्राचार्य डी.एस्. खरात यांनी अभिनंदन केले.
* सुर्या कार्पोरेट क्रिकेट ट्रॉफीच्या तिसऱ्या दिवशी रंगतदार सामन्यांचे प्रदर्शन
सोलापूर – सुर्या ग्रुपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सुर्या कार्पोरेट क्रिकेट ट्रॉफी स्पर्धेत तिसऱ्या दिवशी 10 क्रिकेट संघांनी सहभाग घेत रंगतदार आणि थरारक सामन्याचे प्रदर्शन घडवले.
शनिवार आणि रविवार या दोन दिवशीच सुर्या कार्पोरेट ट्रॉफीचे सामने कर्णिक नगर परिसरातील स्वर्गिय लिंगराज वल्याळ पटागणांवर होत आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सकाळी ओसवाल फायनान्स विरूध्द भुजल कार्यालय यांच्यामध्ये सामना झाला त्यात भुजल कार्यालयाच्या संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेवून ओसवाल संघाला प्रथम फलंदाजी दिली त्यामध्ये ओसवाल फायनान्सच्या फलंदाजांनी शानदार फटकेबाजी करीत 3 खेळाडू गमावून 124 धावां केल्या. परंतु भुजल कार्यालयाच्या संघाने 4 गडी गमावून केवळ 122 धावाच पूर्ण केल्या केवळ 3 धावांनी ओसवाल फायनान्सने हा सामना जिंकला.
त्यानंतर दुपारी जनता सहकारी बँक आणि आयसीआयसीआय बँक यांच्यामध्ये सामना झाला. त्यामध्ये जनता सहकारी बँकेने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षण करणे पसंत केले. फलंदाजी करीत आयसीआयसीआय बँकेच्या खेळाडूंनी 4 गडी गमावून 64 धावा केल्या त्याला प्रत्युत्तर देताना जनता सहकारी बँकेच्या खेळाडूंनी 6 गडी गमावत केवळ 61 धावा केल्या आणि अवघ्या 3 धावाने सामना गमावला. यामध्ये आयसीआयसीआय बँकेचा संघ विजयी ठरला.
त्यानंतर सोलापूर महानगर पालिका संघ आणि एचडीबी फायनान्स यांच्यामध्ये सामना झाला. त्यामध्ये एचडीबी बँकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्विकारले. फलंदाजी करीत सोलापूर महानगर पालिकेच्या संघाने 3 गड्यांच्या बदल्यात 118 धावा केल्या. तर एचडी बँकेचा संघ 3 गडी गमावून केवळ 94 धावावर गुंडाळला. यामध्ये सोलापूर महानगर पालिकेचा संघ विजयी झाला.
नंतर श्रीराम ट्रान्स्पोर्ट विरूध्द जलसंपदा विभागाच्या संघामध्ये सामना झाला श्रीराम ट्रान्सपोर्ट संघाने नाणेफेक जिंकून 5 गड्यांच्या बदल्यात 131 धावांचा डोंगर उभारला तर जलसंपदा विभागाचे 4 गडी बाद करून अवघ्या 65 धावांवर त्यांना रोखून श्रीराम ट्रान्सपोर्ट संघाने सामना आपल्या खिशात घातला. त्यानंतर शेवटी कोटक बँक विरूध्द बँक ऑफ इंडिया यांच्यामध्ये सामना झाला.
त्यामध्ये कोटक बँकेच्या संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्विकारली आणि 7 फलंदाज गमावून त्यांनी 53 धावा केल्या. त्याला प्रत्युत्तर देत बँक ऑफ इंडियाच्या फलंदाजांनी फटकेबाजी करीत 53 धावाचे उद्दिष्ट असताना फटकेबाजी करून 4 फलंदाज गमावून 57 धावा करीत सामना जिंकला.
या स्पर्धेचे हे 10 वे वर्ष आहे. ही स्पर्धा सुर्या ग्रुपचे संस्थापक राजकुमार सुरवसे यांनी सुरू केली. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संजय सुरवसे, जयराम मडीवाळ, आप्पा रामदासी, स्वरूप स्वामी, ज्ञानेश्वर लिंबोळे, काशिनाथ औरसंग, विजय कोनापुरे हे परिश्रम घेत आहेत. पहिल्यांदाच ही स्पर्धा वल्याळ पटांगणांवर होत असल्याने परिसरातील लोक गर्दी करीत आहेत.