मुंबई : काल (सोमवारी) परिवहनमंत्री अनिल परब यांच्या उपस्थितीत अजय गुजर यांनी संप मागे घेतल्याची घोषणा केली. मात्र, अजय गुजर प्रणित संघटनेचा निर्णय मान्य नाही, असे आझाद मैदानातल्या कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे. विलिनीकरणाची मागणी मान्य होईपर्यंत संप सुरुच ठेवण्याचा निर्धार आझाद मैदानातल्या संपकरी कर्मचाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे एसटी संपाचे काय होणार? कर्मचारी काय निर्णय घेणार हे पाहावे लागेल.
कर्मचाऱ्यांनी 22 डिसेंबरपासून रात्री 12 वाजेपासून कामावर रुजू व्हावे. एसटी संपाची नोटीस आम्ही दिली होती. त्यामुळे आमची संघटना संप मागे घेत आहे, अशी घोषणाही अजय गुजर यांनी केली. अजय गुजर यांनी माघार घेतली तरी त्यांना डावलून हा संप सुरुच राहणार असल्याची भूमिका ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी घेतली आहे.
दरम्यान, दोन दिवसांत एसटी सेवा पूर्ववत होईल, अशी आशा प्रशासनाला आहे. मात्र कर्मचारी संपावर ठाम राहिले आहेत. आझाद मैदानात उपस्थित कर्मचाऱ्यांनी यातून माघार घेणार नाही, असं स्पष्ट केलं आहे.
त्वरीत कामावर हजर होणाऱ्या संपकरी कामगारांवरील निलंबन, बडतर्फी, सेवासमाप्ती व बदलीच्या कारवाया मागे घेण्याचे ठोस आश्वासन परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिले. त्यानंतर एसटी कामगार नेते व महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतन श्रेणी एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष अजयकुमार गुजर यांनी संप मागे घेत असल्याची घोषणा करत कामगारांनी कामावर रूजू होण्याचे आवाहन केले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
विलिनीकरणाचा मुद्दा न्यायालयाच्या कक्षात असल्याने तो मुद्दा सोडून अन्य मुद्द्यावर तातडीने बैठक घेऊन मार्ग काढण्याचे आश्वासन अनिल परब यांनी दिले. त्यानंतर एसटी कामगार नेते अजयकुमार गुजर यांनी संप मागे घेत असल्याची घोषणा केली. मात्र कामगारांनी अजयकुमार गुजर यांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत विलिनीकरण होईपर्यंत संप सुरू ठेवणार असल्याची भुमिका घेतली.
एसटी कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणावर ठाम राहत आंदोलन आणि संप सुरूच ठेवला आहे. राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना मोठ्या संख्येने निलंबित केले आहे, त्याचबरोबर बडतर्फीच्या नोटीसही बजावल्या आहेत. परिवहन मंत्री अनिल परब यांनी सोमवारपर्यंत कामावर रुजू होण्याची नोटीस बजावली, पण कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत.अशातच काल एसटी कर्मचारी संघटनेचे नेते अजय गुजर यांनी संपा मागे घेण्याची मोठी घोषणा केली होती.
एसटी कर्मचारी संघटनेने 21 ऑक्टोबर 2021 रोजी राज्य सरकारला सर्वात आधी संपाची नोटीस दिली होती.दरम्यान त्या संघटनेचे नेते अजय गुजर यांनी संपातून माघार घेत असल्याची घोषणा केली आहे.
दरम्यान, दोन दिवसांत एसटी सेवा पूर्ववत होईल, अशी आशा प्रशासनाला आहे. मात्र कर्मचारी संपावर ठाम राहिले आहेत.आझाद मैदानात उपस्थित कर्मचाऱ्यांनी यातून माघार घेणार नाही, असं स्पष्ट केलं आहे.
कर्मचाऱ्यांनी 22 डिसेंबरपासून रात्री 12 वाजेपासून कामावर रुजू व्हावे.अशी एसटी संपाची नोटीस अजय गुजर यांनी दिली होती.जरी अजय गुजर यांनी संपातून माघार घेतली तरी त्यांना डावलून हा संप सुरुच राहणार असल्याची भूमिका ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी घेतली आहे.