लखनौ : उत्तर प्रदेशातील कानपूरमधील व्यापारी पीयूष जैन यांच्या घरी आणि कार्यालयावर आयकर विभागाने छापे मारले आहेत. या छापेमारीवेळी आयकर विभागाला कपाटं भरून नोटा खच्चून भरलेले असंख्य बॉक्स सापडले आहेत. या छापेमारीत 150 कोटी रुपयांची अघोषित संपत्तीचा खुलासा झाला आहे. तसेच आयकर विभागाने 90 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. जैन हे पान मसाला समूहाचे संस्थापक आहेत.
कानपूरमध्ये अत्तर व्यावसायिक आणि सपा नेता पीयूष जैनच्या घरात इन्कम टॅक्स विभागाने छापा टाकल्यानंतर मोठे घबाड आढळून आले आहे. जैन यांच्या घरातून तब्बल 177.45 कोटी जप्त केले आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार, जैन यांच्या घरातून काही इलेक्ट्रॉनिक उपकरणे सापडली आहेत.
त्याची फॉरेन्सिक तपासणी केली जाणार आहे. घरातून 177.45 कोटी रुपये जप्त केले असून ही आतापर्यंतची सर्वाधिक वसुली आहे. याआधी तामिळनाडूमध्ये सर्वाधिक 163 कोटी रुपयांची वसुली झाली होती. जीएसटी इंटेलिजन्स महासंचालनालयाच्या (डीजीजीआय) अधिकाऱ्यांनी एवढी मोठी रक्कम सुरक्षितपणे नेण्यासाठी चलनी नोटा घेऊन जाणाऱ्या कंटेनरची व्यवस्था केली होती.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* रोकड नेण्यासाठी मोठ्या कंटेनरची सोय
एकूण आठ मशीनद्वारे पैसे मोजण्यात आले. रोकड सुरक्षितपणे नेण्यासाठी एका मोठ्या कंटेनरची व्यवस्था करण्यात आली होती. या छाप्याची फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. प्रत्येक फोटोत फक्त रोख रक्कम दिसते. नोटांचे इतके बंडल सापडले आहेत की लोकांना बँकेकडे मदतीसाठी फोन करावा लागत आहे.
अत्तर व्यावसायिक पीयूष जैन सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या जवळचे आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी समाजवादी पार्टीच्या नावावरुन अत्तर लॉन्च केले होते. यामुळे ते चर्चेत होते. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीयूष जैन यांच्या नावावर 40 कंपन्या आहेत. या कंपन्यांच्या माध्यमातून टॅक्स चोरी केली गेली आहे.
सीबीआय (CBIC) चे अध्यक्ष विवेक जौहरी यांनी कानपूर येथे केलेल्या छापेमारीनंतर म्हणाले, त्रिमूर्ती फ्रेगन्सेसच्या तीन संस्थांची केलेल्या छाप्यात जवळपास 150 कोटींची रोख मिळाली आहे. CBIC च्या इतिहासातील ही सर्वात मोठी वसूली आहे.
गुरूवारी सकाळी पीयूष जैन यांच्या घरी, कारखाना, ऑफिस, कोल्ड स्टोरेज आणि पेट्रोल पंपावर एकाच वेळी छापा टाकला. ही कारवाई कानपूर, कन्नौज, गुजरात, मुंबई येथे एकाचवेळी छापे टाकले. दरम्यान पीयूष जैन हे समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या जवळील आहे, अखिलेश यादव यांच्या उपस्थित त्यांनी एक महिन्यापूर्वी लखनौ येथे समाजवादी नावाचे अत्तर लॉन्च केले होते.