नवी दिल्ली / मुंबई : ओमायक्रॉनच्या रूग्णांत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. त्यातच आज राजस्थानमध्ये ओमिक्रॉनचे 21 रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे राजस्थानातील ओमिक्रॉनची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 43 इतकी झाली आहे. तर देशातील ओमिक्रॉन रूग्णांची संख्या 400 च्या पार गेली आहे.
संपूर्ण देशभरात ओमायक्रॉनच्या रूग्णांची संख्या 358 वर पोहोचली आहे. कोरोनाच्या नव्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. देशातील एकूण 17 राज्यांमध्ये ओमायक्रॉनचा फैलाव झाला आहे. यानुसार भारतात आता एकूण 358 ओमायक्रॉनबाधित रूग्ण आढळले आहेत.
देशात दिवसभरात देशात 122 नवे ओमायक्रॉनबाधीत आढळले. यामध्ये दिलासादायक बाब म्हणजे 114 ओमायक्रॉनबाधित रूग्ण बरे झाल्याची नोंद आहे. देशभरात ओमायक्रॉनचे सर्वाधिक रूग्ण हे महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात ओमायक्रॉन व्हेरिएंटची लागण झालेल्या रूग्णांची संख्या 108 वर पोहोचली आहे. दरम्यान ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा निर्बंध लागू करण्यात आलेत. या निर्बंधांप्रमाणे रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत राज्यात जमावबंदी असणार आहे. या काळात 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
लग्नसमारंभ, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रमांवर पुन्हा एकदा निर्बंध लावण्यात आले आहे. क्षमतेच्या 50 % जास्त लोकांना उपस्थित राहण्यास मनाई करण्यात आली आहे. गेल्या चार दिवसांपासून मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या चोवीस तासात मुबंईत 683 रुग्णांची नोंद झाली आहे, तर 267 जणांनी कोरोनावर मात केली आहे. ख्रिसमस आणि नव्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर गर्दीत वाढ झाली असून गर्दीमुळे कोरोनाचा आकडा वाढेल अशी भीती वर्तवण्यात आली आहे.
आज महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे रूग्णांचा आकडा हा सेंच्युरीवर पोहचला आहे. याच वेगाने रूग्णसंख्या वाढत राहिली तर तिसरी लाट ही ओमिक्रॉनचीच असेल हे स्पष्टीकरण राज्याचे आरोगमंत्री राजेश टोपे यांनी आज दिले. ज्या वेगाने ओमिक्रॉनचा वेग वाढला आहे. त्यानुसार लॉकडाऊनचे निकषही बदलावे लागतील, असेही मत राजेश टोपे यांनी मांडले. तसेच ऑक्सिजनच्या आवश्यकतेनुसार हे निकष बदलतील, असेही राजेश टोपे यांनी संकेत दिले. लहान मुलंच्या लसीकरणाबाबत तसेच बुस्टर डोस देण्याबाबतही राजेश टोपेंनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
केंद्राकडे दोन प्रमुख मागण्या केल्या आहेत. आपल्याकडे आरोग्य कर्मचाऱ्यांना बुस्टर डोस देण्याची गरज आहे. कारण आपल्याकडे लसीचे डोस शिल्लक आहेत. केंद्राकडून होकार आल्यास राज्य सरकार पुढची स्ट्रॅटेजी ठरवू शकेल. केंद्राने याबाबतचा विचारपूर्वक निर्णय घेऊन कळवण्याची गरज आहे. राज्याकडून बुस्टर डोसची मागणी केली आहे, असेही टोपे यांनी सांगितले.
राजेश टोपे यांनी शाळांबाबत तूर्तासतरी सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे सध्या शाळा सुरु आहेत, तशाच त्या सुरु राहितील, असेही त्यांनी यावेळी म्हटलंय. मात्र चिमुकल्यांच्या लसीकरणाबाबत सरकारही प्रयत्नशील आहे, असे आरोग्य मंत्री राजेश टोपे असल्याचे सांगितले आहे.