सोलापूर : सोलापुरात पेट्रोल चोरणाऱ्या शिक्षकाला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात पहाटे तीन ते चार वाजेच्या सुमारास शिक्षक गाड्यांमधून पेट्रोलचोरी करत होता.
सोलापुरातील एका नामांकित विद्यालयात तो शिक्षक म्हणून कार्यरत असल्याची माहिती आहे. सन्मती नगर भागात ही घटना उघडकीस आली आहे. सागर सहदेव लाड (रा. वाफळे, ता. मोहोळ) असं पकडलेल्या त्या शिक्षकाचे आहे. आण्णाराव नागनाथ खंडागळे यांनी माढा पोलिसांत फिर्याद दिल्यानुसार सागर लाड याच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.
सागर लाड हा सध्या मोहोळ मधील एका विद्यालयात कलाशिक्षक म्हणून कार्यरत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सन्मतीनगर भागातील मोटारसायकलमधून पेट्रोल चोरी होत होती. यामुळे वाहन चालक त्रस्त झाले होते.
पहाटे आण्णाराव खंडागळे, लक्ष्मण पाटेकर, बापू पाटेकर, राहुल नरखेडकर आणि इतर जणांच्या घरासमोर लावलेल्या मोटारसायकलमधील पेट्रोल काढून चोरुन घेऊन जात असताना विनायक जाधव, अजिंक्य काटे, प्रविण जगदाळे, लक्ष्मण पाटेकर यासह अन्य लोकांनी जागीच रंगेहाथ पकडले.
शिक्षक सागर लाड याने पोलिसांना गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्याच्या अन्य साथीदारांचा माढा पोलिस शोध घेत आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
● चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीच्या डोक्यात कुर्हाड घातली
बार्शी : वडिलांशी मोबाईलवर बोलत असताना चारित्र्याचा संशय घेवून, सासूने दिलेल्या चिथावणीनंतर पतीने कुर्हाड हल्ला करुन पत्नीचे डोके फोडल्याची घटना शहरातील बाळेश्वर नाका परिसरात घडली आहे.
याबाबत जखमी दिपीका किशोर जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन नवरा किशोर सुधाकर जाधव व सासु सिद्धवा सुधाकर जाधव यांच्याविरोधात शहर पोलिस ठाण्यात प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
दिपीका व किशोर या दांपत्याला चार मुले आहेत. किशोर चारित्र्यावर विनाकारण संशय घेऊन दिपीकाला नेहमी शिवीगाळ व मारहाण करतो. दुपारी 02:30 वा. चे सुमारास तिघे घरात असतांना फिर्यादी नव-याच्या मोबाईल वरुन वडीलांना बोलत होत्या. त्यावेळी अचानक नव-याने शिविगाळ करत मोबाईल हिसकावून फोन कट केला.
कपाटावरील कु-हाड हातात घेतली. त्यावेळी सासू हिला मारुन टाक, तिला जिवंत सोडु नको, असे बोलुन घराबाहेर गेल्या. त्यावेळीच घरात मुलगा आदित्य व मुलगी अंकीता होती. नव-याने घराचा दरवाजा आतून बंद करुन घेत कु-हाड डोक्यात मारली.
त्यावेळी त्या मारु नका अशी विनवणी करत असतानाही पुन्हा घाव घातला. त्यामुळे डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्त वाहू लागून त्या खाली पडल्या. त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. त्यावेळी अतिरक्त रक्तस्त्राव होवू लागल्याने त्यांना दवाखान्यात सोडून नवरा व सासू पळून गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.