मुंबई : आज 31 डिसेंबर मुंबईत कोरोना रुग्णवाढ चिंताजनक बनली आहे. गेल्या 24 तासात मुंबईत तब्बल 5,428 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. एका दिवसात तब्बल 47 टक्के वाढ झाली आहे. मुंबईतील सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या 16,441 वर पोहोचली आहे. तर राज्यात एकूण 454 ओमिक्रॉनचे रुग्ण आहेत. यातील 327 रुग्ण हे मुंबईतील आहे. दरम्यान राज्यात आज महाराष्ट्रात एकूण 8,067 रुग्ण आढळले आहेत.
राज्यात आज कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. गेल्या 24 तासात तब्बल 8,067 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. यामध्ये 4 ओमिक्रॉनच्या रुग्णांचा समावेश आहे. तर 1,766 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आज 8 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील सक्रीय कोरोना रुग्णसंख्या 24,509 वर पोहोचली आहे.
राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांना कोरोनाची लागण झाली आहे. यशोमती ठाकूर यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे. मला कोणतेही लक्षणे नाही, तरीही डॉक्टरांच्या सल्ल्याने मी पुढील उपचार घेणार आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन यशोमती ठाकूर यांनी केले आहे.
काँग्रेस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे. मला कोणतेही लक्षणे नाही, तरीही डॉक्टरांच्या सल्ल्याने मी पुढील उपचार घेणार आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी. सगळ्यांना या निमित्ताने आवाहन करत आहे, आपण मास्क वापरावा, काळजी घ्यावी, असे थोरात यांनी म्हटले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी, असं आवाहन राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे. दरम्यान, नुकत्याच 28 डिसेंबर रोजी समाप्त झालेल्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते. अधिवेशन संपल्यानंतर त्यांनी कोरोना तपासणी केली असता त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले.
मागील काही दिवसांपासून कोरोनाची संख्या ही हजाराच्या पुढेच येत आहे. आज रुगणसंख्येने आठ हजाराचा आकडा देखील ओलंडला आहे. त्यातच नाताळ, वर्षाअखेर आणि नवीन वर्ष यामुळे होणाऱ्या गर्दीमुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. तसेच ओमायक्रॉन व्हेरियंटनेही चिंता वाढवली आहे. देशातील सर्वाधिक ओमायक्रॉन बाधित रुग्ण महाराष्ट्रात आहेत.
राज्यात आज आठ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.11 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 24 हजार 509 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात आतापर्यंत 65 लाख 9 हजार 96 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.46 टक्के आहे. सध्या राज्यात 1 लाख 75 हजार 592 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 1079 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6, 90 , 10, 153 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे. मुंबईत आज 5 हजार 428 नवे रुग्ण आढळले आहे. पुणे जिल्ह्यात आज एका दिवसात नवीन 683 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.
सध्या देशात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. गेल्या 24 तासात देशात नऊ हजाराहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासांमध्ये 9 हजार 195 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, 302 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर देशात ओमायक्रॉन रुग्णांच्या संख्येत देखील वाढ होत आहे. सध्या देशभरात ओमायक्रॉनची संख्या ही 800 च्या जवळपास गेली आहे. देशातील 21 राज्यांमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. मागच्या 24 तासात ओमायक्रॉनच्या 128 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या देशात ओमायक्रॉनची रुग्णसंख्या ही 781 आहे. तर उपचारानंतर 241 ओमायक्रॉनचे रुग्ण बरे झाले आहेत.