सोलापूर – सोलापूरचे ग्रामदैवत सिध्दरामेश्वर (Siddharmeshwar Yatra) महायात्रा साजरी करण्यास परवानगी (permission) देण्यात यावी या मागणीसाठी (demand) लोकप्रतिनिधींच्या शिष्टमंडळानं आज जिल्हाधिकारी, पोलीस आणि महापालिका आयुक्त अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. यात्रा सात दिवसावर (7days) आली असता आता धावपळ चालू झाली आहे.
खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य महाराज, आमदार विजयकुमार देशमुख यांनी महापालिका आयुक्त याची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी महापौर श्रीकांचना यन्नम, सभागृह नेते शिवानंद पाटील, यात्रेचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू, सुदेश देशमुख, नगरसेवक नागेश भोगडे आदी उपस्थित होते.
या शिष्टमंडळानं जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांचीही भेट घेतली. ८ दिवसावर सिध्देश्वर यात्रा आली आहे. मात्र यातील नंदीध्वज मिरवणूकीसह इतर धार्मिक कार्यक्रमास परवानगी मिळणार का ? मिळाली तर कोरोना पार्श्वभूमीवर उपस्थितांची मर्यादा किती असेल या विषयी कोणतेही स्पष्टीकरण शासन, प्रशासनाकडून मिळालेलं नाही.
वीरशैव समाज तरुणात तसेच सोलापूरकरात (solapurkar) यामुळे यात्रेविषयी औत्सुक्य आहे. ही यात्रा व्हावी यासाठी समाजातील लोकप्रतिनिधी कोणताही पुढाकार घेत नसल्याबद्दल सोशल मिडियावर नाराजीचे (Dissatisfaction) सुर उमटले होते. या पार्श्वभूमीवर आज (today) लोकप्रतिनिधींनी अधिकाऱ्यांची भेट घेवून यात्रेस परवानगी द्यावी; अशी भूमिका घेतली आहे.
यंदाच्या वर्षी नंदीध्वजासह मोजक्या मानक-यास परवानगी मिळावी याकरिता तसा प्रस्ताव शासनाकडे पाठवून द्यावा, अशी मागणी खासदार (MP) डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, आमदार विजयकुमार देशमुख, महापौर (mayor) श्रीकांचना यन्नम यांनी महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हाधिकारी (DM) मिलिंद शंभरकर, पोलिस आयुक्त हरीश बैजल यांच्याकडे आज केली.
Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
सोलापूरचे (solapur) ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धेश्वर यात्रा (yatra) साजरी करण्यास परवानगी देण्यात यावी, या संदर्भात खासदार डॉ जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी आमदार विजयकुमार देशमुख यांनी महापालिका आयुक्त यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी महापौर श्रीकांचना यन्नम, सभागृह नेते शिवानंद पाटील, यात्रेचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू, सुदेश देशमुख नगरसेवक नागेश भोगडे आदी उपस्थित होते.
भेटीच्या व्हिडिओसह अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी surajya digital फेसबुक पेजला भेट द्या
महापालिका आयुक्त यांच्याशी चर्चेनंतर त्यानंतर यात्रे संदर्भात जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त यांच्याशी चर्चा करण्यात आली. देशभरात दिवसेंदिवस राज्यभरात ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात असतानाच, यंदाच्या वर्षी सिध्देश्वर यात्रे करिता परवानगी प्रशासनाने सिद्धेश्वर यात्रेत (Siddharmeshwar Yatra) मानाच्या नंदीध्वज आणि मोजक्या मानक-यांसह यात्रेचे विधीवत सोपस्कार पूर्ण करण्यासाठी परवानगी घ्यावी, तसा प्रस्ताव शासनाकडे सादर करावा, अशी मागणी खासदार जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, आमदार विजयकुमार देशमुख यांनी मंगळवारी महापौर (mayor) कार्यालयात पालिका आयुक्तांची भेट घेऊन केली.
नंदीध्वजसह मानाचे मानक-यांसह यंदाच्या यात्रेस परवानगी मागितली आहे, अशी माहिती यात्रेचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बु यांनी दिली. मागील वर्षीप्रमाणे यात्रेला परवानगी मिळणार आहेच पण यंदाच्यावर्षी नंदीध्वज आणि मानक-यास यात्रेत परवानगी प्रशासनाने द्यावी म्हणून चर्चा केली. आयुक्त नक्कीच सकारात्मक विचार करतील, असा विश्वास आमदार (mla) विजयकुमार देशमुख यांनी व्यक्त केला.
खासदार, आमदार आणि पालिका आयुक्तांसोबत यात्रेच्या परवानगी करता चर्चा झाली असून त्यानंतर, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, यांच्याबरोबर सुध्दा चर्चा झाली. सकारात्मक विचार करतील, असा विश्वास महापौर श्रीकांचना यन्नम यांनी यावेळी व्यक्त केला.