सोलापूर :– सोलापूर अक्कलकोट रस्त्यावरील कोंडा नगरात झालेल्या ड्रेनेजच्या चेंबरमध्ये गुदमरून ४ कामगारांचा मृत्यू झाल्याप्रकरणी कंत्राटदार आमदारपुत्रासह (MLA’s son) पाच अभियंत्यांना सोमवारी (ता.३) पोलीसांनी अटक (arrested) करून न्यायालयात ( court) उभे केले. न्यायाधीशांनी त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. त्यानंतर जामीन मंजूर करण्यात आला.
सुजित सुरेश खाडे, (khade) संतोष दिलीप बडवे (वय ५१, रा. द्वारका रेसिडेन्सी, जयजलाराम नगर, जुळे सोलापूर), महानगरपालिकेतील कनिष्ठ अभियंता महमंद हनिफ हबीब अल्ला बक्षी (वय ५१, रा. हेवन प्राईड, शनिवार पेठ, पेंटर चौक, सोलापूर), अतुल विष्णुपंत भालेराव ( वय ५२, रा. शिक्षक हौसिंग सोसायटी, ऑफिसर क्लबसमोर, सोलापूर), व्रज कन्स्ट्रक्शन कंपनीचे संचालक केयूर भरतभाई पांचाल ( वय २९, रा. मेघा बंगलोज, गुजरात ग्लास पाठीमागे, जशोदानगर चोकडी, कोकरा,अहमदाबाद, गुजरात सध्या वालचंद कॉलेजच्या पाठीमागे, सोलापूर), महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमधील अधिकारी विजय भिवाजी गायधनकर (वय ५२, रा. उत्तर सदर बझार, सोलापूर) अशी अटक (arrested) केलेल्यांची नावे आहेत. एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यानुसार सोमवारी पोलिसांनी हि कारवाई केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.
सोलापूर महानगर पालिकेच्या वतीने शहरात नगरोत्थान योजनेतून ड्रेनेजचेे काम सुरू असून याचे कंत्राट आमदार सुरेश खाडे (mla suresh khade) यांचे पुत्र सुजित खाडे यांच्या कंपनीला मिळाले, त्यानुसार ते काम करण्यात येत आहे. या कामाच्या दरम्यान कोंडा नगरात ड्रेनेजच्या चेंबरमध्ये गुदमरून चार कामगारांचा मृत्यू (death) झाला होता. याबाबत एमआयडीसी (midc) पोलीस ठाण्यात सोलापूर महानगर पालिकेचे अधिकारी, संबधित कंत्राटदार आणि कंपनी तसेच जीवन प्राधिकरणचे अधिकारी यांच्या विरूध्द गुन्हा (crime) दाखल करण्यात आला होता.
त्यावरून पोलीसांनी सुजित खाडे यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त संतोष गायकवाड करीत आहेत.
मृत्यूप्रकरणी महापालिकेचे अधिकारी, दास कन्स्ट्रक्शन, वज्र कन्स्ट्रक्शन व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांवर भादवि कलम ३०४ प्रमाणे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास सहाय पोलीस आयुक्त संतोष गायकवाड यांच्याकडे देण्यात आला होता. सोमवारी (Monday) चौघांना अटक करून न्यायालयात आणण्यात आले होते. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. वाय. सूळ यांच्यासमोर उभे केले असता त्यांना न्यायाधीशांनी न्यायालयीन कोठडी (mcr custody) मंजूर केली, त्यानंतर त्यांना जामीन देण्यात आला.
चार कामगारांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आमच्याकडून अहवाल मागविण्याची कार्यवाही झाली आहे.
Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
पोलीस पुढील कारवाई करतील. महापालिकेच्या ठेकेदारांनी यापुढील काळात कामगारांना सुरक्षा साहित्य, उपकरणे पुरवावीत; अन्यथा ठेकेदारांवर गुन्हा दाखल होईल. जीवित हानी झाल्यास ठेकेदारासह या कामावरील अभियंते आणि विभाग प्रमुखांवर कारवाई होईल, असे परिपत्रक काढण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी सांगितले.
अक्कलकोट रोडवरील (akaalkot raod) ड्रेनेज चेंबरमध्ये चार कामगारांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात महापालिका प्रशासनाने हात झटकण्याचा प्रयत्न केला. या घटनेत मनपा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कोणत्याही प्रकारची जबाबदारी नव्हती, अशा आशयाचा अहवाल (report) अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे यांनी आयुक्त पी. शिवशंकर यांना सादर केला आहे. आयुक्तांनी यापुढील काळात अशा अनुचित घटना घडल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई होईल, असा इशारा दिला.
कामगारांच्या मृत्यूनंतर आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्तांकडून अहवाल मागविला होता. अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे यांनी सार्वजनिक आरोग्य अभियंता संजय धनशेट्टी, उपअभियंता विजय राठोड, सहायक अभियंता अतुल भालेराव, हनीफ बक्षी यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांना नोटिसा बजावून खुलासे घेतले. मुद्रासन सिटीसमोर २३ डिसेंबर रोजी चार कामगारांचा (worker) मृत्यू झाला. चेंबरच्या जोडणीचे काम २२ डिसेंबर रोजी पूर्ण झाले होते. तरीही २३ डिसेंबर रोजी हे चारही कामगार त्या ठिकाणी का गेले? त्यांना कुणी पाठविले? याची माहिती नसल्याचे अजब उत्तरे अधिकाऱ्यांनी दिली आहेत.
या कामावर जीवन प्राधिकरणचे नियंत्रण (cantrol) आहे. त्यांनीच यावर लक्ष ठेवणे अपेक्षित होते, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. या अधिकाऱ्यांवर विश्वास ठेवून अतिरिक्त आयुक्त खोराटे यांनी या प्रकरणात पालिकेची जवळपास कोणत्याही प्रकारची जबाबदारी नसल्याचा अहवाल आयुक्तांना पाठविला आहे.