श्रीपूर : पुणे ( मांजरी बु. ) येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वतीने दिला जाणारा सर्वोत्कृष्ट ऊस (sugarcane) विकास अधिकारी हा महत्त्वपूर्ण पुरस्कार श्रीपूर येथील श्री पांडुरंग (pandurang) साखर कारखान्याचे (sugar factory) ऊस विकास अधिकारी सोमनाथ भालेकर यांना जाहीर झाला आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे महासंचालक डॉ. शिवाजीराव देशमुख यांनी या पुरस्कारांची घोषणा (announcement) केली.
महाराष्ट्रातील साखर उद्योगात सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांना व साखर कारखान्यांना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वतीने दरवर्षी विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येते. सन २०२०-२१ या गळीत हंगामातील सर्वोत्कृष्ट ऊस विकास अधिकारी हा पुरस्कार ‘पांडुरंग ‘चे सोमनाथ भालेकर यांना जाहीर (declared) झाला आहे. भालेकर यांना पुरस्कार जाहीर झाल्यानंतर कारखान्याचे अध्यक्ष आमदार प्रशांत परिचारक, उपाध्यक्ष कैलास खुळे, कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी, सर्व संचालक मंडळ मुख्य शेतकी अधिकारी संतोष कुमठेकर सर्व अधिकारी, कर्मचारी व ऊस उत्पादक सभासदांनी भालेकर यांचे अभिनंदन केले.
कोरोना संसर्गाच्या (Corona vairs) पार्श्वभूमीवर पुरस्कार वितरणाची नेमकी तारीख अद्याप ठरलेली नाही. आपल्या सर्वोत्कृष्ट कार्यामुळे देश व राज्य पातळीवरील ५० पेक्षा जास्त पुरस्कार मिळवणाऱ्या श्री पांडुरंग साखर कारखान्याच्या पुरस्कारांमध्ये आणखी एका पुरस्काराची भर पडली आहे. देशातील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना म्हणून राष्ट्रीय साखर संघाने या कारखान्यास पुरस्कार देऊन नुकतेच सन्मानित केले आहे.
Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
पांडुरंग कारखान्याच्या ऊस विकास विभागाच्या वतीने कारखान्याच्या ऊस बेणे मळ्यात विविध वाणाचे बेणे तयार करण्याचे काम केले जाते. चांगला साखर उतारा व उत्पादन देणाऱ्या वाणांच्या ऊस बेणे व रोपांचा पुरवठा शेतकर्यांना केला जातो. त्याशिवाय जास्तीचे ऊस उत्पादन घेण्यासाठी कारखान्याने ‘सुपंत ‘ या ब्रँड खाली द्रवरूप जिवाणू खतांची निर्मिती करून त्याचा पुरवठा शेतकऱ्यांना केला जात आहे.
पाणी व माती परीक्षण करण्यासाठी कारखान्याने सुसज्ज अशी प्रयोगशाळेची उभारणी केली आहे. चांगल्या दर्जाचा ऊस गाळपास येण्यासाठी कारखाना प्रशासनाचे व ऊस विकास विभागाचे विशेष लक्ष असते. या सर्व बाबींची दखल घेऊन सोमनाथ भालेकर यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
* आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते सत्कार
वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे यांच्याकडून देण्यात येणारा सर्वोत्कृष्ट ऊस विकास अधिकारी हा पुरस्कार श्री पांडुरंग सहकारी साखर कारखाना लि. श्रीपुर कारखान्याचे ऊस विकास अधिकारी सोमनाथ भालेकर यांना मिळाल्या बद्दल त्यांचा सन्मान श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन (chairman) प्रशांत परिचारक यांच्या हस्ते केला. त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन कैलास खुळे, माजी संचालक अरुण घोलप, शेती अधिकारी संतोष कुमठेकर, युटोपियन शुगर चे शेतकरी अधिकारी धनंजय व्यहवारे, राहुल नागणे उपस्थित होते.