मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीनंतर मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीतही भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. मुंबई जिल्हा बँकेतील सर्वच्या सर्व २१ जागांवर भाजप आमदार प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपने बाजी मारली आहे. दोन जागांवर शिवसेनेचे बंडखोर उमेदवार उभे होते. मात्र, त्यांचा पराभव झाला. त्यामुळे मुंबई जिल्हा बँकेवर प्रवीण दरेकर यांचे वर्चस्व कायम राहणार आहे.
मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीमध्ये सहकार पॅनलचा विजय झाला आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी विजयानंतर मतदारांचे आभार मानले आहेत. तसेच ज्या ४ जागांवर निवडणूक घेण्यात आली होती. त्यामध्ये मध्यवर्ती ग्राहक संस्था मतदार संघातून सहकार पॅनलमधील विठ्ठलराव भोसले यांचा विजय झाला आहे. तर प्राथमिक ग्राहक संस्था मतदार संघातून पुरुषोत्तम दळवी, महिला सहकारी संस्था मतदार संघातून जयश्री पांचाळ आणि राखीव मतदार संघातून अनिल गजरे यांचा विजय झाला आहे. अशा प्रकारे २१ पैकी २१ जागांवर प्रवीण दरेकर यांच्या सहकार पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे.
भाजप नेते आ. प्रविण दरेकर यांच्या सहकार पॅनलने सर्वच्या सर्व २१ जागांवर विजय मिळवला आहे. यापूर्वी १७ जागा बिनविरोध आल्या होत्या. नुकत्याच हाती आलेल्या निकालामध्ये प्रविण दरेकर यांच्या सहकार पॅनेलचे चारही उमेदवार विजयी झाले. मध्यवर्ती ग्राहक (होलसेल कंझ्यूमर्स) मतदार संघातून विठ्ठल भोसले यांनी सुखदेव चौगुले यांचा पराभव केला. विठ्ठल भोसले यांना १८ मतं तर सुखदेव चौगुले यांना १६ मतं मिळाली. प्राथमिक ग्राहक मतदार संघात पुरुषोत्तम दळवी यांनी कमलाकर नाईक यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. पुरुषोत्तम दळवी यांना १३१ मतं तर कमलाकर नाईक यांना ५९ मतं मिळाली. तर, महिला सहकारी संस्था मतदार संघ जयश्री पांचाळ यांना ३३२ मतं तर, शालिनी गायकवाड यांना १८८ मतं मिळाली आहेत.
भटक्या जाती, विमुक्त जमाती व विशेष मागासवर्गीय मतदार संघातून अनिल गजरे यांना तब्बल ४ हजार मते मिळाली तर, यलाप्पा कुशाळकर यांना अवघी ३५० मते मिळाली. प्रवीण दरेकर यांच्या पॅनलमध्ये भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित असलेल्या उमेदवारांचा समावेश होता.
मुंबई बँकेत अभिजीत घोसाळकर, सुनिल राऊत, अभिजीत अडसूळ, शिल्पा सरपोतदार हे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार होते. तर, निवडणुकीतून शिवसेना बंडखोर उमेदवार सुजाता पाटेकर, संजना घाडी आणि स्नेहा कदम यांनी माघार घेतली. तर कमलाकर नाईक यांनी बंडखोरी कायम ठेवली.
Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
मात्र, निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. निकालानंतर प्रविण दरेकर प्रतिक्रिया देताना म्हणाले, मुंबईतील सहकारी चळवळीतील लोकांनी मोठ्या प्रमाणावर विश्वास दाखवल्याने हा विजय मिळाला आहे. नाबार्ड, आरबीआयच्या निकषात काम केल्याने बँकेचा विकास होत आहे. त्यामुळेच आमच्या पॅनलला यश मिळाले, असे दरेकर म्हणाले.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस या बँकेंच्या निवडणुकीबाबत सतत आढावा घेत होते. त्यांचे या बँकेच्या वाटचालीमध्ये फार मोठे योगदान आहे. ज्या काही योजना आणल्या त्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आणल्या होत्या. पालकत्वाच्या भूमिकेतून फडणवीस सातत्याने मार्गदर्शन करत असतात असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले आहेत.
मुंबईकरांनी कुठल्याही गोष्टीला, प्रलोभनाला आणि धमक्यांना न घाबरता सहकार पॅनलला यश दिले असल्याची प्रतिक्रियी प्रवीण दरेकर यांनी दिली आहे. मुंबई बँकेच्या माध्यमातून जो कारभार केला होता त्यावर आता शिक्कामोर्तब झाला असल्याचेही दरेकर म्हणाले आहेत.
प्रवीण दरेकर म्हणाले की, मुंबईकरांनी मुंबईतील सहकारी चळवळीतील कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा आमच्यावर विश्वास दाखवला आहे. पहिल्या १७ जागा बिनविरोध निवड झाल्यानंतर ज्या ४ जागांवर निवडणूक लागली होती. त्या चारही जागांवर उमेदवार प्रचंड मताने निवडून आले आहेत. मुंबई जिल्हा बँकेच्या माध्यमातून जो कारभार करण्यात आला आहे. त्या कारभारावर शिक्कामोर्तब निवडणुकीमुळे झाला असल्याचे दरेकर म्हणाले आहेत.
मुंबई जिल्हा बँकेवरुन अनेक लोकांनी टीका टीप्पणी केली. मुंबई बँक आणि आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला परंतु मुंबई बँकेतील सहकाऱ्यांचा आमच्यावर पूर्ण विश्वास आहे. नाबार्ड, आरबीआय, सहकार खाते यांच्या निकषामध्ये बसत बँकेला प्रगतीकडे नेण्याचे काम केले यामुळे मुंबईकरांनी कुठल्याही गोष्टीला न भुलता सहकार पॅनलला १०० टक्के यश दिले आहे. अशा शब्दात दरेकरांनी विरोधकांना सुनावले आहे.