सोलापूर : 15 ते 18 या वयोगटासाठी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम सुरू करण्यात आले असून सोलापुरातील रेल्वे हॉस्पिटलमध्ये सदरची कोव्हॅक्सिंन लस देण्यात आली.
सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने 15 ते 18 या वयोगटातील मुलां – मुलींना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण राबवण्यात येईल अशी घोषणा केली होती. त्या अनुषंगाने आज तीन जानेवारीपासून सदरचे लसीकरण देशात आणि राज्यात सुरू झाले आहे. सोलापूर शहरांमध्ये देखील विविध सहा लसीकरण केंद्रावर कोरोना प्रतिबंधात्मक कोव्हॅक्सिंन लस देण्यात आली. यासाठी संबंधित लाभार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने बुकिंग करून लस घेतल्याचे पहावयास मिळाले. दरम्यान सोलापुरातील रेल्वे हॉस्पिटलमध्ये पंधरा ते अठरा या वयोगटाचा लाभार्थ्यांनी मोठ्या उत्साहात कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली.
Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
यावेळी महापालिकेचे उपायुक्त धनराज पांडे रेल्वे हॉस्पिटलचे आरोग्य अधीक्षक आनंद कांबळे आदींसह महापालिकेचे आणि रेल्वेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी ऑनलाईन बुकींग केलेल्या लाभार्थ्यांचे कागदपत्रांची तपासणी करून सदरच्या लाभार्थ्यांना प्रतिबंधात्मक लस देण्यात आली.यावेळी उपायुक्त पांडे यांनी लस घेतलेल्या लाभार्थ्यांची संवाद साधताना काळजी घेण्याचे आवाहन केले.
दरम्यान 3 जानेवारीपासून सदरचे लसीकरण मोहीम सुरू झाले असून या मोहिमेचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन उपायुक्त धनराज पांडे यांनी केले आहे. त्याचप्रमाणे रेल्वेचे आरोग्य अधीक्षक आनंद कांबळे यांनी देखील लसीकरणा बाबत अधिक माहिती देताना लसीकरण योग्य पद्धतीने सुरू असल्याचे सांगितले. यावेळी रेल्वेचे वैद्यकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.