पुणे : सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal ) यांचे पुण्यात (pune) निधन ( passes away) झाले आहे. त्या 75 वर्षे वयाच्या होत्या. सिंधुताईंनी अनेक खडतर प्रसंगाना तोंड देत हजारों अनाथ मुलांचा सांभाळ केला. त्यांना 2012 ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार मिळाला होता तर 2021 साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
आपल्या कार्याचा ठसा जनमानसात उमटवणा-या व्यक्तीमध्ये सिंधुताई सपकाळ यांचे नाव आदराने घेतले जाते. सिंधुताई सपकाळ यांच्यावर पुण्यातील गॅलेक्सी रुग्णालयात उपचार सुरु होते. काही दिवसांपूर्वीच सिंधुताई यांच्यावर गॅलेक्सी रुग्णालयातच हर्नियाचे ऑपरेशन करण्यात आले. त्यानंतर सिंधुताई यांना पुन्हा एकदा गॅलेक्सी (galaxy) रुग्णालयात (hospital) दाखल करण्यात होते.
सिंधुताईनां लोक (people) प्रेमाने माई (mai) म्हणत असे. सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. सिंधुताई सपकाळ यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1947 रोजी महाराष्ट्रातील वर्धा येथे झाला. नको असताना मुलगी झाली म्हणून तिचे नाव चिंधी ठेवले. वर्धा जिल्ह्यातील जंगल भागातील नवरगाव ही त्यांची जन्मभूमी. बुद्धिमान असल्या तरी जेमतेम मराठी शाळेत चौथीपर्यंत शिकता आले.
Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
अनाथ मुलांना (Orphan Mai) सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी सिंधुताई यांनी ‘ममता बाल सदन’ संस्थेची स्थापना केली. 1994 साली पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात ही संस्था सुरु झाली. आपली कन्या ममता हिला दगडूशेठ हलवाई संस्थेच्या माध्यमातून शिक्षणासाठी सेवासदन (sevasadan) येथे दाखल केले आणि त्यांनी इतर अनाथ आणि बेवारस मुलांना आधार दिला. येथे लहान मुलांना सर्व शिक्षण दिले जाते. त्यांच्या भोजन, कपडे (clothes) अन्य सुविधा यांची उपलब्धता संस्थेकडून केली जाते.
शिक्षण (education) पूर्ण झाल्यावर येथील मुले आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होतील यासाठीही त्यांना मार्गदर्शन दिले जाते. आर्थिक दृष्ट्या ( Financially) स्वयंपूर्ण झाल्यावर या युवक युवतींना योग्य जोडीदार शोधून देणे आणि त्यांच्या विवाहाचे आयोजन करणे हे कार्यही संस्थेकडूनच केले जाते.
□ सिंधुताई सपकाळ – भावपूर्ण श्रद्धांजली, प्रेतावरची भाकरी भाजून खाल्ली
– सिंधुताई सपकाळ यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1947 रोजी वर्धा जिल्ह्यातील पिंपरी (pinpari) मेघे या गावी अभिमान साठे यांच्या घरी झाला. एक अवांछित बाळ असल्याने त्यांना ‘चिंधी’ (कपड्याचे फाटलेले तुकडे) टोपणनाव म्हणून ओळखले जात असे. त्यांचे वडील त्यांच्या आईच्या इच्छेविरुद्ध सिंधुताईला शिक्षित करण्यासाठी उत्सुक होते. अभिमानजी त्यांना शाळेत पाठवत असत. आर्थिक कारणांमुळे त्यांना वास्तविक दगडी पाटी विकत घेता येत नव्हते.
□ सिंधुताई सपकाळ- अनाथांसाठी मोठे कार्य !
• अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी
• सिंधुताई यांनी ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली होती.
• 1994 साली पुण्याजवळ ही संस्था (ngo) सुरु झाली.
• आपली कन्या ममता हिला दगडूशेठ (dagadusheth) हलवाई संस्थेच्या माध्यमातून सेवासदन येथे दाखल केले आणि त्यांनी इतर अनाथ आणि बेवारस मुलांना आधार दिला.
• येथे लहान मुलांना (child) सर्व शिक्षण दिले जाते. त्यांच्या भोजन, कपडे अन्य सुविधा दिली जाते.
• सिंधुताई यांनी अन्य समकक्ष संस्थाही स्थापन केलेल्या आहेत त्या या पुढीलप्रमाणे – बाल निकेतन हडपसर, पुणे सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह , चिखलदरा अभिमान बाल भवन, वर्धा (vardha)
गोपिका गाईरक्षण केंद्र, वर्धा ( गोपालन) ममता बाल सदन, सासवड सप्तसिंधु महिला आधार बालसंगोपन व शिक्षणसंस्था, पुणे
heya. I notice that you’re most likely interested in building back-links and stuff. I’m promoting scrapebox auto approve link lists. If you’d like to trade ?
A watch is one of the few items of jewelry that can be worn by men of all ages and social backgrounds.
209351 244293This internet page is often a walk-through for all of the details it suited you with this and didnt know who to ask. Glimpse here, and youll certainly discover it. 807627