Sunday, May 29, 2022
सुराज्य डिजिटल
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

मुलगी ममता म्हणतीय , ‘माई गेल्या असं कुणीही म्हणू नका’

Surajya Digital by Surajya Digital
January 5, 2022
in Hot News, महाराष्ट्र
0
मुलगी ममता म्हणतीय , ‘माई गेल्या असं कुणीही म्हणू नका’
0
SHARES
20
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे : ज्येष्ठ समाजसेविका  सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal ) यांच्या पार्थिवावर आज महानुभाव पंथाच्या पद्धतीनुसार अंत्यसंस्कार  करण्यात आले. सिंधूताईंची मुलगी (Daughter) ममता ( Mamta) सपकाळ म्हणाल्या, आई  (mother) गेल्याचं दु:ख कुणालाच सहन होण्यासारखं नाही. सिंधुताईंचं कुटुंब फार मोठं झालेलं आहे. त्यांच्या जाण्याची बातमी मनाला चटका लावून जाणारी आहे. माई गेल्या असं कुणीही म्हणू नका. कारण माई हे एक वादळ होतं, ते फक्त आता शांत झालेलं आहे.

अनाथांची माय ( Orphan mai) सिंधुताई सपकाळ यांचं काल मंगळवारी रात्री  निधन झालं. पुण्यातील गॅलेक्सी केअर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. सिंधूताईंची मुलगी ममता सपकाळ यांच्यासह त्यांच्या नेहमी सोबत असणाऱ्या नातलगांनी रुग्णालयाच्या (hospital) बाहेर शोक (Mourning)   व्यक्त केला.

सिंधुताई सपकाळ यांचे पार्थिव आज (today) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास मांजरी बुद्रुक येथील सन्मती बालनिकेतन येथे आणण्यात आले. त्यावेळी नागरिकांनी अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती. दरम्यान पद्मश्री ( Padma Shri)  सिंधूताई सपकाळ यांना शासकीय इतमामात सलामी देण्यात आली. तसेच सिंधुताई यांच्या पार्थिवावर महानुभव पंथाप्रमाणे दफनविधी करण्यात आले. पुण्यातील ठोसर पागा इथं त्यांच्यावर अंत्यसंस्कार (Funeral) झाले. त्यांना शासकीय इतमामात सलामी देण्यात आली. महिला पोलिसांनी सिंधुताईंना ही सलामी दिली आहे. यावेळी ममता सपकाळ यांच्या हाती भारताचा तिरंगा (tiranga ) सुपूर्द करण्यात आला आहे.

ममता सपकाळ म्हणाल्या की , माईनं केलेल्या कामाच्या स्वरुपात त्या नेहमी आपल्या सोबत राहतील. त्यांनी आमच्यावर केलेले संस्कार ( Rites) आणि त्यांच्या कामाच्या माध्यमातून त्या नेहमीच आमच्या सोबत राहतील असं म्हणत त्यांनी आपल्या भावना ( Emotion) व्यक्त केल्या.

Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

सिंधूताईंची शेकडो मुलं (children), मुली जावई आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांसाठी त्यांच्या जाण्याची बातमी (news) मनाला चटका लावून जाणारी आहे. याबद्दल बोलताना त्यांची कन्या ममता सपकाळ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.ममता यांनी बोलण्यास सुरूवात करताच माई गेल्या असं कुणीही म्हणू नका असं आवाहन केलं. कारण माई हे एक वादळ (Strom) होतं, ते फक्त आता शांत झालेलं आहे.

ज्येष्ठ समाजसेविका (Social worker)  सिंधुताई सपकाळ यांचे निधन झाले. अनाथांची माय सिंधुताईंचे शाहीर सुरेशकुमार वैराळकर यांच्यासोबत 2 दिवसांपूर्वी बोलणे झाले होते. त्यावेळी सिंधुताईंनी मुलांविषयी विचारपूस केली होती. माझ्या मुलांचं कसं आहे, त्यांचं सर्व व्यवस्थित सुरु आहे ना, मुलांची व्यवस्थित सोय राहू द्या. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी सांभाळलेल्या हजारो मुलांची त्या चौकशी करत होत्या, असे वैराळकर यांनी सांगितले.

हलाखीची आर्थिक परिस्थिती आणि न संपणारा संघर्ष ( Conflict) अशा परिस्थितीमुळे सिंधुताईंना शिक्षण पूर्ण करता आले नाही. अवघ्या चौथी शिकलेल्या सिंधुताई यांचे वयाच्या 9 व्या वर्षी विवाह (married) झाला. मात्र लग्नानंतरही त्यांच्या आयुष्यातील संघर्ष संपला नाही. तान्हा मुलीला घेऊन सिंधुताईंनी कधी गोठ्यात तर कधी रस्ते आणि रेल्वे स्थानकांवर भीक (beg) मागून दिवस काढले. यात स्वत: आणि स्वत:च्या मुलीला जगविण्यासाठी त्यांचा पुन्हा संघर्ष सुरु झाला. सामाजिक अत्याचारांच्या बळी ठरलेल्या सिंधुताईंनी मात्र समाजाने नाकारलेल्या लेकरांना आधार दिला. आपल्या मुलीसह या अनाथ मुलांना त्यांनी ममता बाल सदनाच्या माध्यमातून अन्न, शिक्षण आणि निवारा उपलब्ध करुन दिला.

Tags: #Daughter #Mamta #says #Don't #tell #I'mgone #pune#मुलगी #ममता #माई #गेल्या #कुणीही #म्हणूनका #पुणे
Previous Post

धक्कादायक ! महाराष्ट्रातील 13 मंत्री, 70 आमदारांना कोरोना

Next Post

पंजाबमध्ये आंदोलकांनी रस्ता अडवल्याने पंतप्रधान मोदी फ्लायओव्हरवर अडकले

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
पंजाबमध्ये आंदोलकांनी रस्ता अडवल्याने पंतप्रधान मोदी फ्लायओव्हरवर अडकले

पंजाबमध्ये आंदोलकांनी रस्ता अडवल्याने पंतप्रधान मोदी फ्लायओव्हरवर अडकले

वार्ता संग्रह

January 2022
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Dec   Feb »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697