Wednesday, May 25, 2022
सुराज्य डिजिटल
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

सोलापुरात शेततळ्यात बुडून तीन मुलींचा मृत्यू, यात दोन बहिणी

Surajya Digital by Surajya Digital
January 5, 2022
in Hot News, गुन्हेगारी, सोलापूर
1
सोलापुरात शेततळ्यात बुडून तीन मुलींचा मृत्यू, यात दोन बहिणी
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : सोलापुरातील (solapur) मार्डी (mardi) येथे शेततळ्यात ( drowning in farm) बुडून ३ मुलींचा दुर्दैवी मृत्यू (death) झाल्याची घटना आज बुधवारी (५ जानेवारी) घडली आहे. सानिका सोनार (वय १७), पुजा सोनार (वय १३), आकांक्षा वडजे (वय ११ ) असे बुडून मरण पावलेल्या मुलींची नावे (name) आहेत.

या मुली चुलीसाठी लाकुड (wood) गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. तहान लागल्यामुळे शेततळ्यात पाणी पिण्यासाठी उतरल्या तेव्हा ही दुर्घटना घडली. दरम्यान या घटेनेचा पोलीस अधिक तपास करत आहेत.

उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डीतील तीन मुले (three girls) शेततळ्यात पाणी (water) पिण्यासाठी गेले असता पाय घसरल्याने पाण्यात बुडुन मृत्यू झाले आहे. सानिका सोनार, पूजा सोनार अंदाजे व आकांक्षा युवराज वडजे दोन बहीण (sisters) व एक शेजारच्या मुलाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

गावातील सदाशिव जगताप यांच्या शेतातील शेततळ्यात ही घटना घडली. त्या तीन मुली पाणी पिण्यास गेल्या होत्या. त्यांचा पाय (feet) घसरला आणि बुडून त्या ३ मुलींचा मृत्यू झाला आहे, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे.

या घटनेने मार्डी गावावर शोककळा पसरली असून, सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. रानात जळण गोळा करायला गेल्या होत्या. तहान लागल्याने पाणी पिण्यास शेततळ्यात उतरल्या. त्यात त्यांचा बुडून मृत्यू झाला.

Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

● कारची मोटरसायकलला धडक ; पती-पत्नी जखमी

सोलापूर : कारने मोटर सायकलला  धडक दिल्याने धडकेत पती-पत्नी (husband- wife) हे गंभीररीत्या जखमी (injured) झाल्याची घटना ९ डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास जिल्हा मध्यवर्ती बँक सोलापूर किल्ला बगीचा समोर येथे घडली.

याप्रकरणी मधुकर रेवनसिद्ध कोरे (वय-७५,रा.कल्याण नगर,होडगी रोड, सोलापूर) यांनी फौजदार चावडी पोलिस (police) ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून महेश नागनाथ माने (रा. सैफुल, सोलापुर) यांच्याविरुद्ध गुन्हा (crime ) दाखल झाला आहे.

फिर्यादी व त्यांची पत्नी असे मोटारसायकलवरून संजय दूधडेअरी याठिकाणी खवा घेऊन घराकडे जात होते. त्यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँक किल्ला बगीचा (garden) समोर कारचा (car) चालक महेश माने यांनी त्यांच्या ताब्यातील कार हायगायीने चालून फिर्यादी यांच्या मोटारसायकलीला धडक दिली. त्यात फिर्यादी व फिर्यादी ची पत्नी गंभीररित्या जखमी झाले. त्यांना औषध उपचारासाठी दाखल न करता कारचालक (car driver) महेश माने निघून गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेची नोंद  फौजदार चावडी पोलीस ठाण्यात झाली असून, पुढील तपास पोलिस नाईक दराडे हे करीत आहेत.

Tags: #Mardi #sister #dies #drowning #farm #Solapur#सोलापूर #शेततळे #बुडून #3मुली #मृत्यू #मार्डी #बहिणी
Previous Post

पंजाबमध्ये आंदोलकांनी रस्ता अडवल्याने पंतप्रधान मोदी फ्लायओव्हरवर अडकले

Next Post

राज्यातील सर्व विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन होणार; 15 फेब्रुवारीपर्यंत कॉलेज बंद

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
राज्यातील सर्व विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन होणार; 15  फेब्रुवारीपर्यंत कॉलेज बंद

राज्यातील सर्व विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन होणार; 15 फेब्रुवारीपर्यंत कॉलेज बंद

Comments 1

  1. best hair bleaching products says:
    4 months ago

    You completed certain good points there. I did searching on the subject matter and found most persons will go together with your blog

वार्ता संग्रह

January 2022
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Dec   Feb »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697