मुंबई/ सोलापूर : महाविकास आघाडी सरकारमध्ये (mahavikas aghadi) शिवसेना आमदार समाधानी नसल्याचे अनेकदा समोर येते. आणखी एक याचेच एक उदाहरण पुन्हा पुढे आले. सोलापूरच्या सांगोल्याचे (sangola) आमदार (mla) शहाजीबापू पाटील यांनी सेनेला घरचा आहेर दिला. तालुक्यात सेनेची केवळ 1100 मते (Only 1100 votes) असूनही मी आमदार झालो असे सांगताना भाजपची खूप मदत (help) झाल्याचे त्यांनी उघड केले. भाजपचे (bjp) माझ्यावर 24 तास लक्ष होते. सारखे काही अडचण आहे का विचारायला फोन यायचे असेही ते म्हणाले.
महाविकास आघाडी मध्ये शिवसेनेकडे मुख्यमंत्रीपद शिवसेना (Shiv Sena) पहिल्या क्रमांकाचा पक्ष असला तरी शिवसेनेच्या आमदारांमध्ये मोठ्या प्रमाणावर अस्वस्थता आहे. ही अस्वस्थता (Malaise, unless) आणखी दोन आमदारांच्या मुखातून बाहेर आली आहे. शिवसेनेचे हिंगोलीचे आमदार संतोष बांगर आणि सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील या दोन्ही नेत्यांनी आपल्या सरकारला (government ) घरचा आहेर दिला आहे.
सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगोल्यात शिवसेनेची फक्त 1100 मते आहेत. भाजपची मते जास्त आहेत आणि त्यांच्याच बळावर (support) मी सांगोल्यातून निवडून आलो आहे, असे वक्तव्य (statements) केले आहे. हाच तो सांगोला मतदारसंघ आहे, जिथून शेतकरी कामगार पक्षाचे गणपतराव देशमुख (ganpatrao deshmukh) हे दिग्गज आमदार सतत 11 वेळा विधानसभेत पोहचले होते. सांगोल्याने त्यांच्यानंतर शिवसेनेचे आमदार नेते शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांना आपला कौल दिला आहे.
गणपतराव देशमुख यांच्या नातवाचा या निवडणुकीत पराभव ( झाला होता. ही निवडणूक भाजपच्या मतांवर हे आपण जिंकलो कारण शिवसेनेची फक्त सांगोल्यात 1100 मते आहेत, असे परखड बोल शहाजीबापू पाटील यांनी शिवसेना नेतृत्वाला ऐकवले आहेत. महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेचे नेते सर्वात अस्वस्थ आहेत.
Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
उपमुख्यमंत्री ( Deputy Chief Minister) आणि अर्थमंत्री (financial minister) अजित पवार ( ajit pawar ) यांनी आमदार निधी वाटपात दुजाभाव केल्याचा आरोप अनेक शिवसेना आमदारांनी केला आहे. प्रताप सरनाईक, अजय चौधरी यांच्यासारख्या ठाणे – मुंबईतल्या आमदारांनी उघडपणे याविषयी नाराजी ( Dissatisfied) व्यक्त केली आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या (ncp) नेतृत्वावर या सगळ्यांचा राग आहे.
त्यानंतर माजी खासदार अनंत गीते, शिवाजीराव आढळराव पाटील, माजी मंत्री रंदरचे माजी आमदार विजय शिवतारे यांचा देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वावर राग आहे. त्यांनी उघडपणे बोलून दाखवला आहे. या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेतली अस्वस्थता हिंगोली (hingoli) आणि सांगोला या सारख्या दूरवरच्या ग्रामीण भागातही पोहोचल्याचे दिसत आहे.
दुसरीकडे आमदार संतोष बांगर (santosh bangar) यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र (letter) लिहून एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी एसटी महामंडळाची राज्य सरकार (state Government) मध्ये विलीनीकरण करण्याची मागणी केली आहे. एसटी महामंडळाचे विलीनीकरण सध्या शक्य नाही, असे परिवहन मंत्री (Minister of Transport) आणि मुख्यमंत्री (cheif minister) उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय नेते अनिल परब (anil parab) यांनी स्पष्ट करून देखील आमदार संतोष बांगर यांनी अशी आपली मागणी मुख्यमंत्र्यांपर्यंत थेट पत्राद्वारे पोहोचवली आहे.