नवी दिल्ली : आयपीएलचे चेअरमन ब्रिजेश पटेल (chairman brejesh patel ) यांनी मोठी घोषणा केली. पुढील वर्षीपासून आयपीएलचा स्पॉन्सर ‘टाटा’ (tata) असणार आहे, असं पटेल यांनी सांगितलं. त्यामुळे चीनी कंपनी (China company) व्हिवोला (vivo) डच्चू मिळाला आहे. तसेच आयपीएलमधील दोन नव्या टीमला ( अहमदाबाद आणि लखनऊ) बीसीसीआयकडून (BCCI) मंगळवारी औपचारिक मंजुरी मिळाल्याचंही त्यांनी सांगितलं.
आयपीएल 2022 (IPL 2022) साठी नवीन टायटल स्पॉन्सर (new title sponsors) मिळाला असून टाटा ग्रुपकडे (tata group) टायटल स्पॉन्सरची कमान असेल. टाटा कंपनीने चीनच्या विवो कंपनीची जागा घेतली आहे. यामुळे टाटा आयपीएल अशा नावाने यंदाचा हंगाम ओळखण्यात येणार आहे.
आयपीएल गव्हर्निंग काउंसिलची (Governing council) मंगळवारी बैठक (meeting) झाली आहे. या बैठकीमध्ये टाटा कंपनीला आयपीएल टायटल बनवण्याबाबत निर्णय (decision) झाला आहे. तसेच अहमदाबादच्या टीमला खरेदी करणाऱ्या सीवीसी ग्रुपला लेटर ऑफ इंटेंट सोपवण्यात आले आहे.
Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
विवो कंपनीने 2018 मध्ये आयपीएल टायटल स्पॉन्सरशिपचे अधिकार खरेदी केले होते. या करारामध्ये कंपनी बीसीसीआईला प्रत्येक वर्षी 440 करोड रुपये देणार होती. विवोचा करार 2022 पर्यंत होता. मागील वर्षी भारत-चीनमध्ये (india – China) तणावात्मक परिस्थिती निर्माण झाल्यामुळे या कंपनीला एक वर्षांची विश्रांती देण्यात आली होती.
दोन वर्षांनी नव्याने प्रायोजक शोधण्यासाठी पुन्हा प्रयत्न केले जाणार आहेत. पण तोपर्यंत टाटा हेच आयपीएलचे मुख्य प्रायोजक असतील, असे आयपीएल समितीने (cometi) म्हटले. लीगसोबतच्या प्रायोजकत्व करारासाठी विवोकडे काही वर्षे शिल्लक असतानाच कंपनीने करारामधून माघार घेण्याचे ठरवल्यामुळे या लीगचे नाव आता ‘टाटा आयपीएल’ असेल. चिनी स्मार्टफोन निर्मात्यांनी 2020 मध्ये भारत-चीन राजनैतिक वादामुळे ( Political debate) हा करार (agreement) एका वर्षासाठी थांबवला होता. त्यावेळी हे अधिकार ड्रीम इलेव्हनला (dream 11) हस्तांतरित केले गेले. पण आता टाटांना आयपीएलच्या समितीने प्राधान्य देत त्यांच्या नावाची मुख्य प्रायोजक म्हणून घोषणा केली आहे.
□ IPL 2022 Auction ची तारीख ठरली
– यंदा आयपीएलसाठी मेगा ऑक्शन (mega Auction) घेण्यात येणार आहे. सोबतच विवोचे टायटल स्पॉन्सरचे शेवटचे वर्ष असेल. एवढेच नाही तर आयपीएलला लवकरच नवीन मीडिया स्पॉन्सर (new media sponsors) सुद्धा मिळणार आहे.
आयपीएलबाबत मोठी माहिती समोर येत आहे. आयपीएलच्या 15 व्या हंगामात 10 संघ खेळणार आहेत. तसेच येत्या 12 व 13 फेब्रुवारीला बंगळुरू येथे आयपीएलचे ऑक्शन पार पडणार असल्याची माहिती आयपीएल चेअरमन ब्रिजेश पटेल यांनी दिली. तसेच अहमदाबाद व लखनौ या दोन नव्या फ्रँचायझींना प्रत्येकी 3-3 खेळाडू करारबद्ध करण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे.