नवी दिल्ली : रेल्वेत विनाकारण अलार्म साखळी ओढल्यास तुम्हाला सरकारी नोकरीलाही (government job) मुकावे लागू शकते. कारण रेल्वेने नुकतेच साखळी ओढण्याच्या नियमांत बदल केले आहेत. जर एकापेक्षा अधिक वेळेस साखळी ओढण्याच्या घटनेत दोषी (Guilty ) आढळल्यास मोठा आर्थिक भुर्दंड (financial bhurdand) सहन करावा लागतो. एवढेच नव्हे तर दोषी व्यक्तीचे नाव डीसीआरबीमध्ये ( DCRB) पाठविले जाते. सरकारी नोकरीसाठी आवश्यक (required) असणारे प्रमाणपत्र (certificate) मिळविण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
विनाकारण रेल्वेमधील साखळी ओढण्याचे प्रमाण काही मार्गांवर सर्वाधिक आढळते. रेल्वेने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केलीय. या आकडेवारीनुसार उत्तरेकडील राज्यांमधील सर्वाधिक साखळी वाढल्याचे निदर्शनास आलंय. या सर्व घटनांचा रेल्वेला मोठा फटका बसत आहे. साखळीला पर्यायी मार्ग शोधत असल्याचे रेल्वे प्रशासनाने म्हटलंय.
साखळीला पर्यायासाठी चालक आणि सहचालकाचा नंबर प्रत्येक डब्यामध्ये लावण्यात येईल. अडचणीमध्ये या नंबरवर प्रवाशांना संपर्क साधता येईल. याशिवाय दर तीन डब्यांमागे एक कर्मचारी वॉकीटॉकीसह (Walkie talkie) रेल्वेच्या डब्यांमधून सातत्याने फिरणार आहे. अडचणीच्या परिस्थितीमध्ये रेल्वे थांबविण्याविषयी सूचना हा कर्मचारी केबिनला देईल. अशाप्रकारे रेल्वे साखळीला मार्ग काढत आहे.
Pull the railway chain for no reason, quit government job
Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
रेल्वेच्या नियमपुस्तिकेत विनाकारण साखळी ओढणे गंभीर गुन्हा असल्याचे म्हटले आहे. प्रवाशांना नेमकी कायद्याविषयी परिपूर्ण जाण नसते आणि अनेकवेळा समान प्रकारची कृती त्यांच्याकडून घडते. रेल्वेचे अनेक मार्ग साखळी ओढण्याच्या घटनांमुळे विख्यात आहेत. साखळी ओढल्यामुळे निर्धारित वेळेपेक्षा रेल्वेला पोहचण्यास उशीर लागू शकतो असे स्पष्ट रेल्वेच्या बोर्डवर (on board) स्पष्ट केलेले असते. प्रवासी आपले गाव किंवा भागाच्या समोर रेल्वे थांबवतात. विनातिकीट प्रवासी पोलिसांच्या भीतीने स्टेशन येण्यापूर्वीच रेल्वेची साखळी ओढतात. रेल्वेचा वेळ वाया जातो. त्यात प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. अवैध साखळी ओढण्याने रेल्वेची मोठे नुकसान होते. रेल्वेला मोठा आर्थिक तोटाही सहन करावा लागतो. रेल्वे रुळांवरुन घसरण्याचा मोठा धोकाही असतो.
* सुधारित नियमावली
रेल्वेने नुकतेच साखळी ओढण्याच्या नियमांत बदल केले आहेत. त्यामुळे अशाप्रकारच्या अवैध कृती करण्यासाठी सहसा कुणीच धजावत नाही. जर एकापेक्षा अधिक वेळेस साखळी ओढण्याच्या घटनेत दोषी आढळल्यास मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. एवढेच नव्हे तर सरकारी नोकरीलाही मुकावे लागण्याची शक्यता आहे. दोषी व्यक्तीचे नाव डीसीआरबीमध्ये पाठविले जाते. सरकारी नोकरीसाठी आवश्यक असणारे चरित्र प्रमाणपत्र मिळविण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
■ नेमकं जाणून घेऊया रेल्वेची साखळी ओढणे केव्हा वैध ठरेल
• कोणी व्यक्ती किंवा प्रवासाची रेल्वे सुटल्यास
• रेल्वेत आगीची घटना घडल्यास
• ज्येष्ठ व्यक्ती किंवा दिव्यांग रेल्वेत चढत असताना रेल्वे निघणे
• कुणाची तब्येत अचानक बिघडल्यास (हार्ट अटॅक heart attack)
• रेल्वेत हाणामारी, दोन गटांत वाद झाल्यास
वरील कारणांशिवाय रेल्वेची साखळी ओढल्यास एक हजार रुपयांचा दंड किंवा एक वर्षांच्या कारावासाची तरतूद आहे.