अमरावती : छत्रपती शिवाजी महाराज ( Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा पुतळा आमदार रवी राणा (mla Ravi rana) यांनी राजापेठ उड्डाणपुलावर बसवलेला पुतळा महापालिकेने काल रात्री तिथून काढून टाकला. पुतळा बसवणे आणि पुतळा हटवणे हे दोन्ही प्रकार शिवरायांचा अवमान असून आ. रवी राणा आणि महापालिकेत सत्ता असलेली भाजपा (bjp) संपूर्णत: जबाबदार असून शिवरायांच्या अवमानाबद्दल आता रवी राणा आणि भाजपाने माफी मागावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते दिलीप एडतकर (Congress spokesperson Dilip Edatkar) यांनी केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावरुन सुरु झालेल्या वादामध्ये खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. येत्या 19 फेब्रुवारीपर्यंत जर आम्हाला पुतळा बसवण्याची परवानगी मिळाली नाही तर कोणाचा बाप जरी आला तरी आम्ही पुतळा बसवूच, असा इशारा त्यांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे.
शिवरायांच्या अववामानाबद्दल आता रवी राणा व भाजपाने माफी मागावी असे प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते दिलीप एडतकर यांनी म्हटले आहे. महापालिकेत भाजपची सत्ता असून पुतळा (Statue) बसविण्यासाठी परवानगी देणे किंवा पुतळा हटवणे हे महापालिकेच्या अखत्यारीत येत असल्यामुळे पुतळा हटवण्याचे पाप भाजपचेच असून ,या सर्व प्रकारास भाजपच जबाबदार आहे म्हणून भाजप समर्थीत आमदार रवी राणा व भाजपाने जाहीर माफी (Public apology) मागावी अशी मागणी दिलीप एडतकर यांनी केली आहे. Come on. Ravi Rana and BJP insult Shivraj, apologize
Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
मध्यरात्री शिवरायांचा पुतळा बसवणारे आमदार रवी राणा व महापालिकेत सत्ता भाजप पुतळा हटाव प्रकरणी जबाबदार असून त्यांनी शिवरायांचा अवमान केला आहे अमरावती Amravati भाजपची सत्ता असून महापालिकेने हा पुतळा हटवला असे असताना भाजप व भाजपचे समर्थित आमदार रवी राणा पालकमंत्री यशोमती ठाकूर (Guardian Minister Yashomati Thakur) यांच्यावर पुतळा हटाव प्रकरणी टीका करीत आहेत हा अव्वल दर्जाचा निर्लज्जपणा असून महापालिकेत सत्ता असलेल्या भाजपनेच हा पुतळा हटवला असे असताना पालकमंत्र्यांना दोष देणे अत्यंत हास्यास्पद आहे.
बडनेराचे आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभीमान पक्षाच्यावतीने राजापेठ उड्डाणपुलाजवळ रात्रीतून छत्रपती शिवाज महाराज यांचा पुतळा बसवला होता. याची माहिती कळताच अमरावती महापालिकेने रात्रीतूनच हा पुतळा हटवला. बेकायदा पद्धतीनं हा पुतळा उभारण्यात आला होता, असं महापालिकेन याबाबत माहिती देताना सांगितलं.
यावेळी संतप्त झालेल्या नवनीत राणा यांनी ठाकरे सरकारला धारेवर धरलंय. त्यांनी म्हटलंय की, आपल्या महाराष्ट्रामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा ज्याची राजापेठ उड्डाणपुलावर स्थापना करण्यात आली होती. गेल्या तीन वर्षांपासून या पुतळ्यासाठी शिवभक्त जागेची परवानगी मागत होते. मात्र, आजतागायत ती परवानगी देण्यात आलेली नाहीये. त्यानंतर शिवभक्तांनी तो पुतळा स्थापन केला. तो पुतळा या ठाकरे सरकारने हटवला आहे.
पुढे त्यांनी म्हटलंय की, शिवाजी महाराजांवर बोललेलं बाळासाहेब ठाकरेंना सहन व्हायचं नाही. पण आज त्यांचेच सुपुत्र जे मुख्यमंत्री पदावर आहेत. त्याच महाराष्ट्रात (maharashtra) आज शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी परवानगी मिळत नाहीये. तो पुतळा मध्यरात्री हटवण्याची कारवाई तुम्ही करता? शिवभक्तांना तुरुंगात टाकत आहात? आज महाराष्ट्र या परिस्थितीत उभा आहे. लोकप्रतिनिधींना महाराजांच्या पुतळ्यासाठी भांडावं लागतंय… कुठे गेले आदरणीय बाळासाहेब ठाकरेंचे विचार…? कुठे गेले त्यांचे आदर्श? असा सवाल नवनीत राणा यांनी उपस्थित केला.