मोहोळ : लिप्ट Lift मागत चाकूचा धाक दाखवत लुटणाऱ्या त्या ८ महिलांना न्यायालयाने दोन दिवसाची पोलिस कोठडी police सुनावली आहे. रस्त्यावरील लोकांना कशाप्रकारे लुटत होत्या. पैसे न दिल्यास भलतीच धमकी दिली जात होती.
याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एम. एच. १३, बी.एल. १७२० या दुचाकीवरून मोहोळ तालुक्यातील कोन्हेरी येथील गणेश दादाराव पांढरे हे गावाकडे निघाले असताना त्यांना हिवरे पाटीजवळ hiwarepati गायत्री हॉटेलजवळ Gayatri hotel सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या दरम्यान एका महिलेने हात करत मदत मागून आमची ऊसाची टोळी पुढे उतरली आहे. मला त्या टोळी जवळ सोडा अशी विनंती केल्याने पांढरे यांनी त्या महिलेला गाडीवर बसवले. त्यानंतर संकेत धाब्याच्या sanket dhaba पुढे थोड्या अंतरावर गेल्यानंतर त्या महिलेने इथे गाडी थांबवा आमच्या महिला आहेत, असे सांगितल्याने पांढरे यांनी गाडी थांबवली.
त्यांची गाडी थांबल्याचे बघताच सुनंदा जगन्नाथ शिंदे, मीनाबाई जगन्नाथ शिंदे, रणुबाई आनंद शिंदे (तिघी रा. कसई ता. तुळजापुर), सुषमा बापू चव्हाण (रा. बोरामणी, ता. उ. सोलापूर), सुनंदा सुनिल काळे, काजल नेताजी शिंदे, दीपिका राजू चव्हाण, ममता संभाजी भोसले, (चौघीही रा. मुळेगाव ता. उ. सोलापूर) या ८ महिलांनी गाडीला गराडा घालून उभ्या राहिल्या.
त्यांच्या खिशातील रोख २ हजार ४०० रुपये काढून घेतले. तसेच त्यांना मारहाण करत चाकूची भीती घातली. याबाबत कोणाला काही सांगितले तर आम्ही तुझ्यावर छेडछाडीचा गुन्हा दाखल करेन अशी धमकीही दिली होती. त्यानुसार गणेश पांढरे यांनी मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. मोहोळ पोलिसांच्या पथकाने तपास करित वरील ८ महिलांना अटक केली. त्यांना मोहोळ येथील न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक धनाजी खापरे करीत आहेत. 8 women remanded in police custody for looting in Mohol
Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
□ दोघाना मारहाण, महिलेसह चोघांवर गुन्हा दाखल
मोहोळ : मुलीची बदनामी Defamation का केली ? असे म्हणत एकाला मारहाण करत असताना त्याचा भाऊ brother सोडवण्यासाठी आल्याचा राग मनात धरून मुलीच्या भावाने त्याच्या डोक्यात हातोडा मारून गंभीर जखमी injured injured केल्याची घटना गुरूवारी (दि. २० जानेवारी) दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान मोहोळ mohal तालुक्यातील तांबोळे येथे घडली.
याप्रकरणी एका महिलेसह ४ जणांवर मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी मनोज बापू चौधरी रा. तांबोळे यांचे सन २०२१ मध्ये औंढी येथील शिवानी चव्हाण या मुली सोबत लग्न झाले होते. गेल्या तीन वर्षांपूर्वी मनोज चौधरी यांची पत्नी wife शिवानी ही तिचे आईचे सांगण्यावरून घरात वादविवाद argument करून माहेरी गेली होती.
त्या दरम्यान एकमेकांविरोधात कोर्टात court तक्रार दाखल होती. त्यानंतर आपापसात मिटवून गेल्या एक ते दीड वर्षापासून पत्नी शिवानी ही तांबोळे येथे नांदायला गेली होती. त्यानंतरही चौधरी यांच्या सासरचे लोक अधून मधून त्यांच्या पत्नीला भरवून परस्परांमध्ये भांडण लावत होते.
गुरूवारी सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान मनोज चौधरी यांचे मेहुणे हनुमंत सदाशिव चव्हाण, विठ्ठल सदाशिव चव्हाण व सासु मैनाबाई चव्हाण, सासरे सदाशिव चव्हाण असे चौघे जण त्यांच्या घरी गेले होते. यावेळी मनोज चौधरी याला वरील चौघांनी तुझा भाऊ सुनील कोठे आहे. त्याने आमची मुलगी वागण्यास खराब आहे असे म्हणून लोकात बदनामी केली आहे.
त्याला बोलावून घे असे सांगितल्यानंतर साधारण १२ वाजण्याच्या दरम्यान सुनील sunil हा दुचाकीवरून घरी आला. त्याला बघितल्यानंतर हनुमंत व सदाशिव या दोघांनी काठ्यांनी मारहाण सुरू केली. त्यावेळी फिर्यादी मनोज हे भांडण सोडवण्यासाठी गेले असता, हनुमंत याने समोर पडलेला हातोडा घेऊन मनोज यांच्या डोक्यात मारला. तर विठ्ठल याने हातातील सत्तुरने डोक्यात मारत असताना तो मार चुकवला.
तसेच सासू मैनाबाई व सासरे सदाशिव यांनी फिर्यादी ची आई भांडण सोडवण्यासाठी आली असता त्यांनाही काठ्यांनी मारहाण केली. भांडणाचा आवाज ऐकून शेजारच्या वस्तीवरील लोकांनी सोडवा सोडवी केली. तुझ्या भावाने आमच्या मुलीची बदनामी केली असल्याचा रोष मनात धरून हनुमंत याने डोक्यात हातोडा मारला तर विठ्ठल, मैनाबाई व सदाशिव यांनीही माझ्या भावाला व आईला मारहाण केली असल्याची फिर्याद मनोज चौधरी यांनी मोहोळ पोलीस police police ठाण्यात दिली.
याप्रकरणी वरील चौघांवर गुन्हा crime दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे करीत आहेत.