औरंगाबाद : गुंतवणूक आणि उत्पादन वाढीच्या दृष्टीने नवीन विकसनशील शहरांची यादी ‘ग्ली- स्टेटी जनरली- इनोव्हॅझिऑन – मॅक्रोइकॉनोमिया’ Glee-State Generally-Innovation – Macroeconomics या इटालियन मासिकाने Italian Magazine जाहीर केली आहे. नाविन्यपूर्ण उत्पादनाच्या जगातील पहिल्या 5 महत्त्वाच्या शहरांत औरंगाबादला स्थान दिले आहे. तसेच चीनमधील बीजिंग टियानजिन, मुंबई, दक्षिण कोरियातील सेऊल, अमेरिकेतील बोस्टन आणि जर्मनीतील ड्रेस्डेन Beijing Tianjin, Mumbai, Seoul in South Korea, Boston in the US and Dresden in Germany ही शहरे देखील या यादीत आहेत.
गुंतवणूक आणि उत्पादन वाढीच्या दृष्टीने नवीन विकसनशील शहरांची ओळख Identification of developing cities करून देणाऱ्या नियतकालिकाने याबाबत सर्व्हे केला होता. त्यानुसार ही यादी प्रसिद्ध झाली आहे. आमदार अंबादास दानवे(Ambadas Danve) यांनी ही बातमी ट्विटरवरुन शेअर करत शिवसेनेचे योगदान विचारणाऱ्या पक्षांनी ही बातमी वाचावी असा टोला विरोधी पक्षांना लगावला आहे.
इटलीतील ग्ली स्टेटी जनरली इनोव्हॅझिओन- मॅक्रोइकॉनॉमिया या इटालियन मासिकाने नावीन्यपूर्ण उत्पादन घेणाऱ्या जगातील पहिल्या पाच महत्त्वाच्या शहरात औरंगाबादला स्थान दिले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील जागतिक दर्जाची नावीन्यपूर्ण उत्पादने या बाबींवर औरंगाबादचा यात समावेश करण्यात आला आहे. Aurangabad beat top 5 cities in the world
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
इटालियन मासिकाने जगातील अव्वल पाच गुंतवणूकक्षम शहरात #संभाजीनगर ला स्थान दिले. शिवसेनेचे योगदान विचारणाऱ्यां पक्षांनी ही बातमी वाचावी. उद्योजकांच्या मेहनतीला सलाम आहेच. मात्र गुंतवणूकपूरक शहराला लागणाऱ्या सुविधा देण्यात पक्ष म्हणून शिवसेनेचे योगदान नाकारता येणार नाही. pic.twitter.com/Eo1duw90lW
— Ambadas Danve (@iambadasdanve) January 24, 2022
याबाबत आमदार अंबादास दानवे ज्यांनी ही बातमी शेअर केली आहे. त्यांनी म्हटले आहे, इटालियन मासिकाने जगातील अव्वल पाच गुंतवणूकक्षम शहरात संभाजीनगरला स्थान दिले. शिवसेनेचे योगदान विचारणाऱ्यां पक्षांनी ही बातमी news वाचावी. उद्योजकांच्या मेहनतीला सलाम आहेच. मात्र गुंतवणूकपूरक शहराला लागणाऱ्या सुविधा देण्यात पक्ष म्हणून शिवसेनेचे योगदान नाकारता येणार नाही.
इनोव्हॅझिओन-मॅक्रोइकॉनॉमिया मासिकाने याबाबत अहवाल प्रसिद्ध published केला आहे. या अहवालात औरंगाबाद शहराविषयी म्हटले आहे, औरंगाबाद हे जवळपास आठ लाख लोकसंख्येचे शहर आहे. ऑटोमोटिव्ह, अभियांत्रिकी आणि फार्मास्युटिकल्स Automotive, engineering and pharmaceuticals यासारख्या उत्पादन क्षेत्रांत हे शहर प्रगती करत आहे.
शहराच्या औद्योगिक वसातही अत्यंत विस्तीर्ण असून त्यात सीमेन्स, बीएमडब्ल्यू, स्कोडा Siemens, BMW, Skoda यासारख्या विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे प्लांट्स आहेत. उद्योगाबरोबरच औरंगाबादमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठदेखील आहे. संपूर्ण भारतातील लोकप्रिय विद्यापीठांमध्ये याची गणना होते. असे यात म्हणण्यात आले आहे.