संजय राऊतांनी ते ट्विट केले डीलीट
मुंबई : खासदार संजय राऊत यांनी ट्विट केलेल्या एका व्यंगचित्रावरून भाजप खासदार पूनम महाजन BJP MP Poonam Mahajan चांगल्याच भडकल्या आहेत. या व्यंगचित्रात बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन दिसत आहेत. वरती कॅप्शनमध्ये कोण कोणामुळे वाढले? उघडा डोळे बघा नीट असे लिहिले आहे. यावरून पूनम महाजन म्हणाल्या, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे व स्वर्गीय प्रमोद महाजन या दोन मर्दानी हिंदुत्वासाठी युती केली होती. नामर्दांसारखे कार्टून दाखवू नका.
शिवसेनेचे (shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपला (bjp) उत्तर देताना एक व्यंगचित्र ट्विट केलं होतं. त्या व्यंगचित्रावरुन आता नवा वाद सुरु होण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांचं ट्विट समोर आल्यानंतर भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन (pramod mahajan) यांच्या कन्या आणि खासदार पूनम महाजन (poonam mahajan) यांनी संताप व्यक्त करत संजय राऊत यांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. (Poonam Mahajan Slam on Sanjay Raut’s Cartoon)
राऊत यांनी भाजपवर टीका करताना इतकी खालची पातळी गाठली की, राऊत जाणूनबुजून आपण प्रमोदजी महाजन यांचा अवमान केला हे देखील समजले नाही. याच प्रकाराला आता पूनम महाजन यांनी उत्तर दिलं आहे. “स्वर्गीय बाळासाहेब व स्वर्गीय प्रमोदजी, या दोन मर्दांनी हिंदुत्वासाठी युती केली होती. नामर्दांसारखे कार्टून दाखवू नका.”, असा सणसणीत टोला त्यांनी लगावला.
प्रमोद महाजन हे भाजपचे नेते होते. त्यांच्यावर व्यक्तीगत टीका करण्यासाठी नाही तर भाजप त्या काळी जे काही होती. ते दाखवण्यासाठी ते ट्विट केलं होतं.
स्वर्गीय बाळासाहेब व स्वर्गीय प्रमोदजी, या दोन मर्दांनी हिंदुत्वासाठी युती केली होती.
नामर्दांसारखे कार्टून दाखवू नका. https://t.co/dK8l81ZLub— Poonam Mahajan (मोदी का परिवार) (@poonam_mahajan) January 24, 2022
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
पूनम आता कुठे आहेत मला माहीत नाही. त्यांचं भाजपशी नातं काय आहे?, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. भाजपमध्ये महाजन परिवार, मुंडेंचं कुटुंब असो की मनोहर पर्रिकराचं कुटुंब असेल सर्वांना अंधारात ढकललं असल्याची टीका संजय राऊतांनी केली आहे. तुम्ही भाजपमध्ये कुठं आहात हे मला पूनम महाजनांना विचारायचंय, असंही राऊत म्हणाले आहेत.
संजय राऊत यांनी नंतर ते ट्विट डिलीट tweet deleted केलं, मात्र… संजय राऊत यांनी नंतर ते ट्विट डिलीट केलं मात्र भाजपच्या खासदार पूनम महाजन यांनी आता प्रत्युत्तर दिलं आहे. “स्वर्गीय बाळासाहेब व स्वर्गीय प्रमोदजी, या दोन मर्दांनी हिंदुत्वासाठी युती केली होती. नामर्दांसारखे कार्टून दाखवू नका”, अशा शब्दात पूनम महाजन यांनी संजय राऊत यांना उत्तर दिलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसैनिकांशी संवाद साधला. या संवादामध्ये हिंदुत्त्वाच्या मुद्यावरुन उद्धव ठाकरे यांनी भाजपला फटकारलं होतं. त्यानंतर भाजपाचे देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं.