अमरावती : आंध्र प्रदेशातील Andra pradesh नेल्लोरजवळ nellur रक्तचंदनाची तस्करी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये गुंटूरच्या रापूर rapur जंगालातील रक्तचंदनाची झाडे तोडणाऱ्या 55 मजुरांसह 3 तस्करांना अटक arrested करण्यात आली आहे.
पोलिसांना गोपनीय सुत्रांनी दिलेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत रक्तचंदनाची 45 खोडं, 24 कुऱ्हाडी, 31 मोबाईल फोन, एक टोयोटा कार आणि 75 हजार 230 रुपये रोख असा मुद्देमाल जप्त केला आहे.
पुष्पा स्टाईल pushpa stayal तस्करी करणाऱ्यांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. राखीव जंगलात असलेल्या रक्तचंदनाची झाडं कापणाऱ्या ५५ मजुरांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यासोबतच ३ तस्करांनादेखील गजाआड करण्यात आलं आहे. रापूरच्या जंगलातून पोलिसांनी तस्करांना बेड्या ठोकल्या. Attack on police like ‘Pushpa’ movie, 55 laborers and 3 smugglers arrested
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
पोलिसांनी लाकूड तोडणारे मजूर आणि तस्करांना पकडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी पोलिसांवर दगडांनी आणि कुऱ्हाडींनी हल्ला चढवला. वाहनांच्या मदतीनं तिथून पळण्याचा प्रयत्नदेखील मजुरांनी केला. मात्र पोलिसांनी 55 मजुरांना आणि 3 तस्करांना पकडलं.
अटकेत असलेला मुख्य तस्कर वेलोर दामू velour damu हा चित्तूर जिल्ह्याच्या विबीपुरम क्षेत्राचा रहिवासी असल्याची माहिती नेल्लोरचे एसपी विजया राव sp vijaya rao यांनी दिली. तो पुद्दुचेरीच्या कुपन्ना सुब्रमण्यमच्या संपर्कात होता. दामूचा मेहुणा राधाकृष्णनदेखील तस्करी करतो. तस्कर 20 जानेवारीला नेल्लोर जिल्ह्यातल्या गुडूरला पोहोचले. त्यांनी रापूरच्या जंगलात असलेली रक्तचंदनाची झाडं कापली.
अनेकदा याठिकाणी या झाडांच्या वादावरून मोठा रक्तपात Bleeding झाला आहे. अनेकांचे बळी देखील गेले आहेत. यामुळे आता या कारवाईमुळे अनेकांचे धागेदोरे यामधून समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. रक्तचंदनाला जगभरात प्रचंड मागणी आहे. भारतामध्ये अनेक ठिकाणी रक्तचंदनाची झाडे आहेत. दक्षिण भारतातील कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि केरळ Karnataka, Andhra Pradesh, Tamil Nadu and Kerala in South India या राज्यांतील जंगलांमध्ये मुबलक प्रमाणात रक्त चंदन आढळते.