सोलापूर : नेरले (ता.करमाळा karmala) येथे घरात शेकोटी पेटवून बसले असला धोतराला आग लागल्याने चतुर्भुज बाबू पनाळकर (वय १००) हे वृद्ध भाजून जखमी झाले. ही घटना मंगळवारी (ता. पहाटेच्या सुमारास घडली. थंडी असल्याने ते पहाटे ४ वाजेच्या सुमारास घरात शेकोटी पेटवून समोर बसले होते. अचानक आगच्या भडक्याने त्यांच्या धोतराला आग लागल्याने हा प्रकार घडला. त्यांना बार्शी येथे प्राथमिक उपचार करून बाबूराव( मुलगा) यांनी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले. तालुका पोलिसात याची नोंद झाली आहे. A 100-year-old man was injured in a fire
□ खंडोबाची वाडी येथे आत्महत्येचा प्रयत्न
खंडोबाचीवाडी (ता.मोहोळ) येथे राहणाऱ्या सुनिता श्रीधर नरके (वय ३८) या विवाहितेने घरगुती वादातून विषारी द्रव प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केली. ही घटना आज मंगळवारी सकाळच्या सुमारास घडली. तिला मोहोळ येथे प्राथमिक उपचार करुन सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
□ वेळापुरात एकाचा मोटारसायकलने धडक दिल्याने मृत्यू
वेळापूर : पंढरपूर पालखी मार्गावर दिनांक २३ जानेवारी रोजी रोजी घराकडे साईडपट्टी वरून जात असताना पाठीमागून मोटरसायकलने धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला आहे.
संभाजी नरहरी सुरवसे (वय ७३, रा. रत्न विहार, यशवंतनगर, अकलूज, ता. माळशिरस) असे मृताचे नाव आहे. यात संतोष संभाजी सुरवसे यांनी वेळापूर पोलीसात फिर्याद दिली. वेळापूर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद झाले आहे. २३ जानेवारी रोजी मयत संभाजी नरहरी सुरवसे हे रात्री ७.१५ च्या सुमारास उघडेवाडी तालुका माळशिरस हद्दीतील शिवरत्न कंट्रक्शन च्या समोरून माळशिरस ते पंढरपूर जाणारा हायवे रोड क्रॉस करून साईड पट्टीवरून युवराज गंभीरे यांच्या घराकडे पायी चालत जात होता.killed in a two-wheeler collision
त्यास पंढरपूरकडून येणारा अर्जुन देवकर (रा. वरकुटे ता. इंदापूर जि. पुणे ) याने त्याच्या ताब्यातील मोटर सायकल निष्काळजीपणाने चालून संभाजी सुरवसे यांना जोराची धडक दिली. त्यांच्या डोक्यात मार लागल्याने त्यांना उपचारासाठी अकलूज येथील खासगी हॉस्पिटल येथे दाखल केले असता त्यांच्यावर उपचार चालू असताना ते २४ जानेवारी रोजी मृत्यू झाला. अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय रेगुडे हे करीत आहेत.