वैराग नगरपंचायतीच्या पहिल्या नगराध्यक्षपदी माजी सरपंच सुजाता डोळसे यांची बिनविरोध निवड निश्चित
बार्शी : वैराग नगरपंचायतीच्या पहिल्या नगराध्यक्षपदी माजी सरपंच सुजाता संगमेश्वर डोळसे Former Sarpanch Sujata Sangameshwar Dolse यांचीच बिनविरोध निवड होणार, हे आता स्पष्ट झाले आहे. आज गुरुवारी मुंबई येथे काढण्यात आलेल्या सरपंच पदाच्या आरक्षणामध्ये वैरागचे नगराध्यक्षपद अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव झाले आहे.
नगरपंचायतीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत बहुमत मिळविणार्या राष्ट्रवादीकडे त्या एकमेव उमेदवार असल्यामुळे आणि विरोधी पक्षाकडे उमेदवारच नसल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. नगराध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेची आता फक्त औपचारिकता उरली आहे. The last sarpanch in Vairag will get the honor of the first mayoral post
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
डोळसे या वैराग ग्रामपंचायतीच्या शेवटच्या सरपंच होत्या. त्यांना आता ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रुपांतर झाल्यानंतर पहिल्या नगराध्यक्ष होण्याचा मान मिळणार आहे. त्यामुळे त्या भाग्यवान ठरल्या आहेत. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत त्या प्रभाग 13 मधून विरोधी भाजपच्या उमेदवाराचा 110 मतांने पराभव करुन निवडून आल्या आहेत. राष्ट्रवादीचे नेते निरंजन भूमकर NCP leader Niranjan Bhoomkar यांचे कट्टर कार्यकर्ते संगमेश्वर डोळसे sangmeshwar dolse यांच्या त्या पत्नी आहेत.
त्यांच्या गेल्या पाच वर्षाच्या सरपंचपदाच्या कारकीर्दीत वैराग vairag मध्ये अनेक विकासकामे राबविली गेली आहेत. त्यांचे माहेर मोहोळ mohol तालुक्यातील बोफले येथील आहे.