मुंबई : अभिनेत्री रवीना टंडनचे वडील रवि टंडन यांचे निधन झाले आहे. रवि टंडन हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक होते. मजबूर, खुद्दार आणि अनहोनी यांसारखे सुपरहिट चित्रपट त्यांनी बनवले. रवि टंडन यांनी मुंबईतील राहत्या घरी पहाटे अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. दरम्यान, वडिलांच्या निधनानंतर रवीना टंडनने नुकतीच सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केली.
बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनचे वडील रवी टंडन यांचे आज शुक्रवारी पहाटे ३.३० वाजता त्यांच्या मुंबईतील राहत्या घरी निधन झाले. रवी टंडन यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांच्या मुंबईतील राहत्या घरी निधन झाले. एका माहितीनुसार रवी टंडन हे मागील काही काळापासून फुफ्फुसाच्या आजाराने ग्रस्त होते. त्यांना फुफ्फुसाचा फायब्रोसिस नावाचा आजार झाला होता. यामुळे त्यांना श्वास घेण्यास खूप त्रास होत होता.
रवीना टंडनने वडिलांच्या निधनाची बातमी सांगताना तिचे तिच्या वडिलांसोबतचे चार फोटो शेअर करत, कॅप्शनमध्ये ‘तुम्ही नेहमी माझ्यासोबत असाल. मी नेहमी तुमच्यासारखीच राहीन. मी तुम्हाला कधीही जाऊ देणार नाही. लव्ह यू बाबा.’ रवीनाने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये तिचे वडिलांसोबतचे काही बालपणाचे फोटो देखील आहेत. रवी टंडन यांच्या निधनावर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी दुःख व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
Actress Ravina Tandon’s father and director Ravi Tandon has passed away
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
रवी टंडन यांना रवीना आणि राजीव टंडन ही दोन मुलं असे असूनही रवीनाने तिच्या वडिलांचे अंतिम संस्कार केले. यावेळी तिचा भाऊ राजीव टंडन देखील उपस्थित होता. आपल्या हिंदू धर्मामध्ये पुरुषच अंतिम संस्कारांचे विधी पूर्ण करतात. मात्र रवीनाने आपल्या परंपरेला तोडत स्वतः लाडक्या वडिलांना शेवटचा निरोप दिला.
रवी टंडन हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक होते. रवी यांनी सुरुवातीच्या काळात दिग्दर्शक आर के नय्यर यांच्यासोबत सहायक म्हणून काम केले. पुढे त्यांनी संजीव कुमार यांना घेऊन ‘अनहोनी’ हा सिनेमा बनवला. या सिनेमातील संजीव कुमार यांच्या अभिनयाचे आजही कौतुक केले जाते. त्यानंतर त्यांनी ‘खेल खेल मैं’ हा सिनेमा ऋषी कपूर यांच्यासोबत बनवला. अमिताभ बच्चन यांना घेऊन रवी टंडन यांनी ‘मजबूर’ आणि ‘ख़ुद्दार’ हे सिनेमे बनवले होते. रवी टंडन आणि संजीव कुमार यांची मैत्री बॉलिवूडमध्ये खूपच प्रसिद्ध होती.
रवि टंडन यांनी अनेक हिट चित्रपट दिग्दर्शित केले होते. ‘खेल खेल में’, ‘मजबूर’, ‘अनहोनी’, ‘खुद्दार’, ‘जिंदगी’, ‘नजराना’, ‘एक मैं और एक तू’, ‘जवाब’, ‘आन और शान’, ‘निर्माण’, ‘झूठा कहीं का’, ‘चोर हो तो ऐसा’ या चित्रपटांचे दिग्दर्शन करून त्यांनी आपला चित्रपटसृष्टीत ठसा उमटवला. सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्यांनी दिग्दर्शन कारकीर्दीची सुरूवात केली आणि काही चित्रपटांचे दिग्दर्शन तसेच निर्मिती केली. १९६० मध्ये रिलीज झालेल्या ‘लव्ह इन शिमला’ या चित्रपटात ते अभिनेता म्हणून देखील झळकले होते.