पुणे : पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. वडिलांनी 4 दिवसांच्या बाळाला ताम्हिणी घाटातील दरीत फेकून दिले. या बाळाचा शोध सुरु आहे. मंगल चव्हाण mangal chavan ही महिला कारने रत्नागिरी जिल्ह्यातील अंबडस या गावाकडे चालली होती. त्यावेळी तिचा पती सचिन चव्हाण व त्याच्या भावांनी ताम्हिणी घाटात In Tamhini Ghat कार थांबवली व मंगलच्या कुशीतील 4 दिवसांच्या बाळाला जबरदस्तीने घेतले. त्यानंतर त्याचा गळा आवळून त्याला दरीत टाकून दिले.
महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी शोधकार्य सुरू केलं आहे. पुणे – माणगाव रस्त्यावरील ताम्हिणी घाटात हा प्रकार घडला आहे. काल शनिवारी पहाटे, पौड पोलिसांनी बाळाच्या हत्येप्रकरणी रत्नागिरीतील खेडमधून चार जणांना अटक केली आहे. पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी यासंदर्भात महिती दिली आहे. ‘मुलाच्या आईने शुक्रवारी पोलिसात तक्रार दाखल केली होती. सध्या बाळाचा शोध सुरू आहे.
संबंधित महिला शेळके वस्तीत वास्तव्यास आहेत. रत्नागिरीतील खेड हे तिचं मूळ गाव आहे. या ठिकाणी महिलेचे एका 27 वर्षांच्या व्यक्तीची संबंध होते. घटनेचा माहिती मिळताच आम्ही संबंधित व्यक्तीला त्याच्या भावाला आणि इतर दोघांना अटक केली आहे. पौडमध्ये 30 जानेवारीला महिलेची प्रसूती झाली होती. Shocking incident in Pune; A 4-day-old baby was thrown into a ravine
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
यावेळी महिलेचे संबंध असणारा पुरुष आणि त्याचे मित्र प्रसूतीसाठी आले होते. शनिवार, 5 फेब्रुवारीच्या पहाटे हे चारजण महिलेसोबत खेडला जाण्यासाठी निघाले. यावेळी ते ताम्हिणीतील पुलावर थांबले आणि महिलेच्या हातातून बाळाला घेऊन गेले. तासाभराने ते परतले आणि गाडीत बसून निघून गेले. अखेर महिला खेडहून परतली. यानंतर तिने पोलिसात तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला, असं पोलिसांनी सांगितलं.
□ कशामुळे घडली ही निर्दयी घटना
मूळची आंबेत, ता.म्हसळा, जि. रायगडमधील रहिवासी असलेली मंगल पवार ही मजूर महिला घोटवडे, ता.मुळशी परिसरात राहत होती. तिच्या पहिल्या पतीचे निधन झाले होते व त्यापासून तिला एक 11 वर्षाची मुलगी होती. महिलेचे नात्यातील सचिन गंगाराम चव्हाण (मूळ रा.आंबादास, ता.खेड, जि.रत्नागिरी) याच्या सोबत सूत जुळल्याने त्याच्यासोबत ती शेळकेवाडी-गोडांबेवाडी परिसरात तिच्या मुलीसह राहत होती. सचिनपासून आलेल्या संबंधातून 30 जानेवारी रोजी महिलेने बाळाला जन्म दिला.
सचिनचे भाऊ संजय गंगाराम चव्हाण, नितीन गंगाराम चव्हाण, अजय गंगाराम चव्हाण ( तिघेही रा. आंबादास, ता.खेड, जि.रत्नागिरी) हे सचिनला पीडित महिलेसोबत राहू नकोस म्हणून सांगून घेऊन जात असत. मुलाला जन्म दिल्यानंतर ते आणखी खवळले. त्यातूनच ही निर्दयी घटना घडली.