सोलापूर : राज्यातील गुन्हेगारीला प्रतिबंध घालणाऱ्या गुन्ह्याचा तपास जलदगतीने करून कायदा आणि सुव्यवस्था राखणाऱ्या राज्यातील पाच पोलीस ठाण्यांची सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे म्हणून निवड झाली असून, यामध्ये सोलापूरच्या जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचा समावेश आहे. अपर पोलीस महासंचालक राजेंद्र सिंह यांनी ही घोषणा केली.
कायदा व सुव्यवस्था गुन्हे प्रतिबंध दोषसिद्धी यामध्ये सुधारणा व्हावी, यासाठी देशपातळीवर १० सर्वोत्कृष्ट पोलीस ठाण्यांची निवड करण्याचा निर्णय केंद्रीय स्तरावर घेण्यात आला होता. यांसाठी राज्यातील पोलीस ठाण्यांची निवड देशपातळीवर करण्याच्या उद्देशाने राज्यातील पाच पोलीस ठाण्यांची निवड करण्यासाठी समित्यांची निवड करण्यात आली होती.
जोडभावी पेठ पोलिस ठाणे, सोलापूर वाकुंज पोलिस ठाणे औरंगाबाद, बाबुळगाव पोलिस ठाणे यवतमाळ, सेवली पोलिस ठाणे जालना, राजूर पोलिस ठाणे अहमदनगर असे पाच ठाण्याची नावे आहेत. Jodbhavi Peth from Solapur selected among the top five police stations in the state
या समितीच्या अहवालानुसार राज्यातील पाच सर्वोत्कृष्ट ठाण्यांची निवड करण्यात आली आहे. यात सोलापूर शहरातील जोडभावी पेठ पोलीस ठाणे, औरंगाबाद शहरातील वाळूज पोलीस ठाणे, यवतमाळमधील बाभूळगाव पोलीस ठाणे, जालनामधील शेवली पोलीस ठाणे आणि अहमदनगरमधील राजूर पोलीस ठाण्याची निवड करण्यात आली आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
सन २०१६ मध्ये झालेल्या कॉन्फरन्स मध्ये पोलीस ठाणेनिहाय कामकाजात निकोप स्पर्धा वाढावी, तसेच कायदा व सुव्यवस्था, प्रतिबंध दोष सिद्धी यामध्ये सुधारणा व्हावी, यासाठी देशपातळीवर सर्वोत्कृष्ट पोलीस ठाण्याची ‘बेस्ट पोलीस स्टेशन’ निवड करण्याबाबतचा निर्णय केंद्रीय स्तरावर घेण्यात आला होता.
गृहविभागाने घेतलेल्या स्पर्धेत सोलापुरातील जोडभावी पेठ पोलिस ठाण्याचा राज्यात टॉप फाइव्हमध्ये समावेश झाला आहे. यामुळे सोलापूर आयुक्तालयाच्या कामगिरीचे कौतुक होत आहे. केंद्रीय गृह विभागाने देशभरातील प्रत्येक शहरांमधून काही निकषांच्या आधारे, पोलिस ठाण्याबाबत प्रस्ताव मागवले होते.
त्यामधून पोलिस ठाण्यांची निवड केली होती. त्या आदेशान्वये संबंधित राज्यांच्या प्रत्येक शहरातील पोलिस ठाण्याकडून प्रस्ताव मागवले होते. त्यानुसार जोडभावी पेठ पोलिसांनी प्रस्ताव सादर केला होता. त्यामध्ये त्याची दखल गृहविभागाने घेतली. सन २०२०-२१ या कालावधीतील कामगिरीचा आलेख आहे.
या बाबत अधिक माहिती देताना जोडभावीचे तत्कालीन पोलिस निरीक्षक तथा विद्यमान सुरक्षा विभाग निरीक्षक बाळासाहेब भालचीम म्हणाले, पोलिस ठाण्याची निवड होण्याची बाब गौरवास्पद आहे. पोलिस आयुक्त, उपायुक्त, सहायक आयुक्तांसह सर्व पोलिस ठाण्यांचे अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या संघटित प्रयत्नांचे यश आहे. गृहविभागाच्या निकषांप्रमाणे आमच्या कामगिरीची मांडणी केली होती. त्यामध्ये आम्हाला यश मिळाले. सोलापूर पोलिस आयुक्तालयासाठी ही आनंदाची बाब आहे.
“पोलिस आयुक्तालयासाठी हा मोठा बहुमान आहे. नागरिकांप्रति चांगले काम, कायदा व सुव्यवस्था, गुन्हेगारीवर नियंत्रण या निकषाप्रमाणे चांगले काम केल्याची ही पावती आहे.”
डॉ. वैशाली कडूकर, परिमंडळ उपायुक्त