अहमदनगर : जिल्ह्यातील श्रीगोंदा ते काष्टी रस्त्या दरम्यान हॉटेल अनन्या येथे ऊसाच्या ट्रेलरला पाठीमागून स्विफ्टकार धडकल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात मित्राला सोडवण्यासाठी जाताना तीन तरूणांचा मृत्यू झाला. या अपघातात तिघांचाही जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
तालुक्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरु आहे ऊस वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला मागील बाजूस रिफ्लेक्टर नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढल्याचे सांगण्यात येत आहे. राहुल आळेकर, केशव सायकर, आकाश खेतमाळीस अशी मृत तरुणांची नावे आहेत. दरम्यान, ऊस वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला मागील बाजूस रिफ्लेक्टर नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढल्याचे बोललं जातं आहे.
आज रविवारी (दि .१३) पहाटे एक ते दीड वाजण्याच्या सुमारास श्रीगोंदा -काष्टी रोडवर सदर अपघात झाला. काष्टीला आपल्या मित्राला सोडवायला हे तीन तरुण निघाले होते. Swiftcar crash kills three in Ahmednagar
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
शहरातील राहुल सुरेश आळेकर (वय २२), काष्टी येथिल केशव सायकर (वय २२), श्रीगोंदा शहरातीलच आकाश रावसाहेब खेतमाळीस (वय १८) अशी अपघातात मृत्यू पावलेल्या तरुणांची नावे आहेत.
आकाश आणि राहुल हे केशव सायकरला सोडविण्यासाठी काष्टीला जात असताना अपघात झाला. तिनही मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने श्रीगोंदा काष्टीत शोककळा पसरली आहे. अपघात घडल्यानंतर हॉटेल अनन्याचे मालक महेश शेंडगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याठिकाणी धाव घेत अपघातग्रस्त तरुणांना त्यांच्या वाहनातून बाहेर काढत उपचारासाठी नेण्यासाठी १०८ गाडी बोलावली.
परंतु यातील केशव व आकाश या दोन तरूणांचा जागीच मृत्यू झाला होता. राहुलला उपचारासाठी श्रीगोंदयात आणले. परंतु तोपर्यत व देखील मृत पावला होता. मिळालेल्या माहितीनुसार राहुल व आकाश हे केशव याला काष्टी येथे सोडवण्यासाठी मित्राची स्विफ्ट कार घेऊन निघाले होते त्यावेळी रात्रीच्यावेळी ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रेलरला जोरदार धडक बसल्यामुळे हा भीषण अपघात झाला.