मुंबई : खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मोठी घोषणा केली आहे. मराठा आरक्षणासाठी 26 फेब्रुवारीला मी स्वतः आमरण उपोषणाला मुंबईतील आझाद मैदानात बसणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मी सर्वांना घेऊन जाणारा माणूस आहे. मी शाहू महाराजांचा वारस आहे. मला सगळ्यांना एवढचं सांगायचे आहे की आम्हाला टिकणारे आरक्षण द्या, असंही ते म्हणाले.
संभाजीराजे छत्रपती यांनी एक ट्विट केले आहे. त्यात म्हटले आहे की, मराठा आरक्षण व समाजाच्या इतर अनुषंगिक मागण्यांबाबत समाजातील सर्व क्षेत्रातील मुख्य घटकांशी विचार विनिमय करून मी माझी पुढील दिशा ठरविलेली आहे. पण मी ठरवलंय की माझी भूमिका पाच मुद्द्यांसाठी असणार आहे. पाच ते सहा मुद्दे महाराष्ट्र शासनाने स्पष्ट करायला पाहीजेत. परंतु राज्य सरकारने हे पाच मुद्दे स्पष्ट केले नाहीत. तर आम्ही 26 फेब्रुवारीपासून आमरण उपोषणाला सुरूवात करणार आहोत, असा इशारा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सरकारला दिला आहे.
मी मराठा आहे म्हणून मराठा आरक्षणासाठी लढतो आहे असं नाही. 5 मे 2021 ला आरक्षण रद्द झालं. मागील काही दिवसांत अनेकवेळा आंदोलनं केली. परंतू अजूनही कोणतीच मागणी पूर्ण नाही. मी आत्तापर्यंत आक्रमक होतो परंतू आता मी उद्विग्न झालो असल्याचे वक्तव्य खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केले. मराठा आरक्षणासाठी 26 फेब्रुवारीला मी स्वतः आमरण उपोषणाला मुंबईतील आझाद मैदानात बसणार असल्याचे संभाजीराजे यांनी यावेळी सांगितले.
Sambhaji Raje Chhatrapati’s big announcement; Maratha reservation to fast till death from 26th February
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
मला समन्वयक यांनी सांगितल की टोकाची भूमिका घेऊ नका. परंतू सरकार काहीच हालचाल करतं नाही. त्यामुळे माझी भूमिका आहे की आता 26 फेब्रुवारीला मी स्वतः आमरण उपोषणाला मुंबईतील आझाद मैदानात बसणार असल्याचे त्यांनी सांगितले. मी सर्वांना घेऊन जाणारा माणूस आहे मी शाहू महाराजांचा वारस आहे. मला सगळ्यांना एवढचं सांगायचे आहे की आम्हाला टिकणारे आरक्षण द्या. मी सगळ्या पक्षाच्या नेत्यांना हात जोडून विनंती केली की आरक्षण द्या. आरक्षण कशामुळे गेलं हे देखील सांगितले परंतू काहीच हालचाल झाली नाही. मी आरक्षण रद्द झाल्यानंतर रिव्ह्यू पिटिशन दखल करा असं सांगितल. परंतू खुप दिवसांनंतर याचीका दाखल केली. सध्या त्याची काय परिस्थिती आहे हे काहीच माहिती नाही.
माझं स्पष्ट मत आहे की समिती स्थापन करा. परंतू अजून काहीच केलं नसल्याचे संभाजीराजे म्हणाले.
सर्वोच्च न्यायालय म्हणत आहे की 50 टक्क्यांच्यावर आरक्षण द्यायचं असेल तर अपवादात्मक परिस्थिती असायला हवी. अनेकजण म्हणातात की ओबीसीमधून आरक्षण द्यायला हवं, परंतु माझं म्हणणं आहे की टिकणारं आरक्षण द्या. मी सर्व नेत्यांच्या दारी गेलो. मूक आंदोलन कोल्हापुरात केलं परंतू, यांनी काहीच केलं नाही. मोजून पाच ते सहा मागण्या आहेत परंतू अजूनही मान्य होत नाहीत.
मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी अनेक दिग्गजांच्या भेटी घेतल्या आहेत. राज्यभरातील अनेकांसोबत मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर त्यांनी चर्चा केली आहे. मराठा आरक्षणासाठी पुढील वाटचाल कशी असणार आहे याबाबतची दिशाही ते आज ठरवणार आहेत.
□ या आहेत पाच मागण्या ?
} मराठा आरक्षणामुळे 2014 ते 5 मे 2021 पर्यंतच्या शासन सेवेत निवड झालेल्या सर्व उमेदवारांना कायमस्वरूपी नियुक्ती द्यावात. ओबीसींच्या धर्तीवर मराठा समाजाला सवलती लागू करा.
} सारथी ही शाहू महारांजाच्या नावाने उभा राहीलेली संस्था आहे. सारथीच्या माध्यमातून तुम्ही तुम्हाला सुशिक्षीत करू शकता. प्रत्येक जिल्ह्यात सारथी संस्थेची उपकेंद्रे सुरू करून त्याठिकाणी शिक्षण, संशोधन आणि प्रशिक्षणाचे उपक्रम राबवावेत.
} अण्णासाहेब पाटील महामंडळाला भरघोस निधी मिळावा. लाभार्थी पात्रतेसाठी असलेल्या अटी शिथिल कर व्याज परताव्याची 10 लाख रूपयांची मर्यादा वाढवून किमान 25 लाख रूपये करावी.
} पंजाबराव देशमुख वसतिगृहात शासनाकडून निर्वाह भत्ता दिला जातो. यामध्ये मुंबई, नागपूर, पुणे अशा महानगरांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना 3 हजार रूपये प्रति महिना दिले जातात. ही रक्कम वाढवावी. तसेच वसतिगृहांच्या धर्तीवर मराठा विद्यार्थ्यांसाठी देखील पहिल्या टप्प्यात किमान प्रत्येक जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी कायमस्वरूपी वसतिगृहांची उभारणी करावी.
} मराठा समाज सुद्धा बहुजन समाजाचा एक घटक आहे. त्यामुळे वंचित मराठा समाजाला न्याय मिळाला पाहीजे. त्यासाठी मराठा समाजासाठीच नव्हे तर बहुजन समाजाला 18 पगड जाती आणि 12 बलुतेदारांना एका छताखाली कसं आणता येईल, यासाठी माझा प्रवास होता. 5 मे 2021 रोजी मराठा आरक्षण रद्द झालं. याची सर्वांना कल्पना आहे. त्यामुळे आम्ही अनेक मोर्च देखील काढले, असे छत्रपती संभाजीराजे म्हणाले.