बार्शी : खडी क्रशरच्या विरोधातील तक्रारी मिटविण्यासाठी 5 लाखांची खंडणी मागून 50 हजार रुपये जबरदस्तीने घेतल्या प्रकरणातील मुख्य आरोपी समाधान नागनाथ तिरेकर (रा. इसबावी ता. पंढरपूर) यास तालुका पोलिसांनी अटक केली.
त्यास रविवारी न्यायालयासमोर उभे केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. याप्रकरणी पुढील तपास स.पो.नि. शिवाजी जायपत्रे करीत आहेत. उद्योजक सुनील राधेशाम भराडीया यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन समाधान व त्याच्या साथीदारांविरोधात तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सुनील भराडीया यांचा मुलगा राघव याचे बार्शी शहरालगत असलेल्या ताडसौंदणे गावाच्या हद्दीत परवानाप्राप्त खडी क्रशर आहे. 15 दिवसांपूर्वी आजूबाजूच्या शेतकर्यांनी खडी क्रशरचा त्रास होत असल्याच्या तक्रारी केल्या होत्या. त्यावर भराडीया यांनी उपाययोजना केल्यानंतर तक्रार मागे घेतली गेली होती. Arrest of main accused for taking ransom to clear complaints against stone crusher
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
[embedyt] https://www.youtube.com/watch?v=KPDIOZ3LfVI[/embedyt]
शुक्रवारी दुपारी त्यांना बार्शीतून समाधान बोलतो, असे सांगत फोनवर तुझं क्रशर बेकायदेशीर आहे. तुझ्याविरुध्द शेतकर्यांनी तहसीलदारकडे तक्रार दिली आहे. माझ्या मागे पत्रकार आहेत. तुझे क्रशर बंद कर, अशी धमकी दिली गेली. त्यावर त्यांनी माझं क्रशर कायदेशीर आहे. माझ्याकडे सर्व परवानग्या आहेत. तुम्ही या तुम्हाला दाखवितो, असे उत्तर दिले. संध्याकाळी पुन्हा त्यांना त्या व्यक्तीचा फोन आला आणि माझं व पत्रकार लोकांचं सगळ्याचं मिटवावं लागेल, तू आज नाही भेटला तर तू उद्याचा दिवस बघत नाही, अशी धमकी दिली गेली. त्यावर त्यांनी खडी क्रशरवर या, समक्ष बोलू असे सांगितले.
रात्री 10.30 च्या सुमारास ते खडी क्रशरवर आपला मित्र शहाजी वाळके व मुलगा राघव आणि त्याचा मित्र सचिन जाधव यांच्यासमवेत बसलेले असताना दोघेजण आले. त्यापैकी एकाने तुझं खडी क्रशरचं प्रकरण मिटवायचं असेल तर 5 लाख रु. द्यावे लागतील. असं म्हटल्यानंतर त्यांनी माझं क्रशर रितसर आहे, असे सांगितलं.
[embedyt] https://www.youtube.com/watch?v=qzRYBUwZ6kg[/embedyt]
त्यावर त्याने टेबलावरील सामान फेकून दिलं. त्यामुळे त्यांच्यात धक्काबुक्की झाली. त्या व्यक्तीने तू मिटवतो म्हणला होता. पैसे दे अशी खंडणी मागितली. त्यावर त्यांनी ड्रावर मधून 50 हजार रुपये काढून त्यास दिले. त्याने दर महिन्याला मला 50 हजार रुपये द्यायचे, असं धमकावले आणि तो निघून गेला. भराडीया यांनी या घटनेचे व्हिडीओ चित्रीकरण केले. त्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली.