Saturday, May 28, 2022
सुराज्य डिजिटल
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

मुंबई पुणे महामार्गावर भीषण अपघात; काँग्रेस नेते गौरव खरातसह सोलापूरचे चारजण ठार

Surajya Digital by Surajya Digital
February 15, 2022
in Hot News, गुन्हेगारी, सोलापूर
0
मुंबई पुणे महामार्गावर भीषण अपघात; काँग्रेस नेते गौरव खरातसह सोलापूरचे चारजण ठार
0
SHARES
27
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोलापूर  : मुंबई – पुणे एक्सप्रेस वेवर खोपोलीजवळ बोरघाटात आज मंगळवारी सकाळी (ता. १५) भीषण अपघात झालाय. या भीषण अपघातामध्ये चार जण जागीच ठार झाले असून पाचजण जखमी, यातील तीन गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच एम. जी. एम. रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

यात ट्रक आणि टेम्पोच्या मध्ये सापडून कारचा चुराडा झाला. यात कारमधील चौघांचा मृत्यू झाला. सर्व मृतदेह खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालयात नेण्यात आले आहेत. गौरव खरात (३६), सौरभ तुळसे (३२), सिद्धार्थ राजगुरू (३१ ), मयुर दयानंद कदम (वय ३० सर्व रा. सोलापूर) वेगाने मदतकार्य करून अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या सह्याने रस्त्यावरुन बाजूला केली. सध्या या मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत झाली आहे. Terrible accident on Mumbai-Pune highway; Congress leader Gaurav Kharat and four others killed in Solapur

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

[embedyt] https://www.youtube.com/watch?v=3eG6O6YrOIo[/embedyt]

अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी surajya digital फेसबुक पेजला भेट द्या

आज सकाळी साडेसहाच्या सुमारास मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर हा अपघात झालाय. एका ट्रेलरचा ब्रेक फेल झाल्याने सहा ते सात वाहने एकमेकांना धडकली. यात ट्रक आणि टेम्पोच्या दरम्यान आल्याने कारचा चुराडा झाला. या भीषण अपघातामध्ये दोन मोठ्या वाहनांच्यादरम्यान चिरडल्या गेलेल्या कारमधील चौघेही जागीच ठार झालेत.

ट्रेलरचा ब्रेक फेल झाल्याने पाच वाहनांचा अपघात घडला. पाच वाहनांचा अपघातात कंटेनरने पुढे जाणा-या स्वीफ्ट कारला धडक दिली. स्वीफ्ट कार तिच्या पुढे जणाऱ्या आयशर टेम्पोला मागून धडकली. टेम्पोने तिच्या पुढील वेन्यू कारला जोरदार धडक दिली. या अपघातात स्वीफ्टमधील चारही प्रवासी जागीच ठार झाले तर टेम्पोने धडक दिलेल्या कारमधील तीन प्रवासी किरकोळ जखमी झाले. टेम्पोची धडक बसलेल्या वेन्यू कारने पुढे जाणा-या कंटेनरला जोरदार धडक दिली. मात्र हा कंटेनर पुढे निघून गेला.

□ भीषण अपघात; काँग्रेस नेत्यासह 4 जणांचा मृत्यू, 3 जखमी

मुंबई-पुणे एक्सप्रेसवर खोपोली हद्दीत आज पहाटे सहा वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातात सोलापूरमधील काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष गौरव खरात यांच्यासह चौघांचा मृत्यू झाला. मृत झालेले तिघे सोलापूरचे  आहेत. तसेच या अपघातात तीन जण जखमी झाले आहेत. ते जालना जिल्ह्यातील आहेत. गौरव खरात यांच्या अपघाती मृत्यूमुळे काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे.

Tags: #Terrible #accident #Mumbai-Pune #highway #Congress #leader #GauravKharat #four #killed #Solapur#मुंबई #पुणे #महामार्ग #भीषण #अपघात #काँग्रेसनेते #गौरवखरात #सोलापूर #चारजण #ठार
Previous Post

‘हिजाब’वरून ‘हिंदू-मुस्लिमात’ भांडणे लावणा-यांसमोर चिमुकल्यांनीच उभा केला सवाल

Next Post

महाराष्ट्रात भाजपाचे सरकार बनविण्याची तयारी : चार राज्यात भाजपाला विजयाची खात्री

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
महाराष्ट्रात भाजपाचे सरकार बनविण्याची तयारी : चार राज्यात भाजपाला विजयाची खात्री

महाराष्ट्रात भाजपाचे सरकार बनविण्याची तयारी : चार राज्यात भाजपाला विजयाची खात्री

वार्ता संग्रह

February 2022
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28  
« Jan   Mar »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697