□ महाविकास आघाडी सरकार लवकरच पडेल – रामदास आठवले
□ वाईन विक्रीला आरपीआयचा विरोध
पंढरपूर : महाविकास आघाडी सरकार सर्व स्तरावर निष्क्रिय ठरले आहे. केंद्र सरकारकडून आलेला निधी व योजना राबविण्याची मानसिकता नसल्याने जनतेमधून आक्रोश व्यक्त होताना दिसत आहे. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पडले तर भाजपाची सत्ता स्थापन करण्याची तयारी असल्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.
पंढरपूर येथे केंद्रीय मंत्री रामदास आठवले आले होते. शासकीय विश्रामगृह येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राजाभाऊ सरवदे, सुनिल सर्वगोड, संतोष पवार, सोमनाथ भोसले, चंद्रकांत वाघमारे उपस्थित होते.
रामदास आठवले म्हणाले की, आण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाला राज्य सरकारकडून जास्ती जास्त निधी देण्यात यावा. निधी कमी देण्यात येत असल्याने लाभार्थ्यांना योजनेपासून वंचित रहावे लागत आहे. BJP ready to form government in Maharashtra: BJP sure of victory in four states
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
केंद्र सराकारकडून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना शिष्यवृती वेळेत दिली जाते. परंतु राज्याकडून विद्यार्थ्यांना शिष्यवृती वेळेत न दिल्याने विद्यार्थ्याचे नुकसान होत आहे. महाराष्ट्रातील रस्त्यांची अवस्था वाईट झाली आहे. याच खड्ड्यात महाविकास आघाडी सरकारला घालण्याचे काम जनतेला करायचे आहे, असे आवाहन आठवले यांनी केले.
□ बाळासाहेबांच्या विचारांच्याविरोधात आघाडी
राज्य सरकारच्या कारभारावर आठवले यांनी जोरदार टीका केली. राज्य सरकार योग्य काम करीत नाही यामुळे रस्त्यावर सर्वत्र खड्डे असून असे सरकार खड्ड्यात घालावे लागेल अशी टीका केली. केंद्राकडून मागासवर्गीय विद्यार्थ्यांना वेळेत शिष्यवृत्ती दिली जाते परंतु राज्य सरकार ती विद्यार्थ्यांना लवकर देत नाही. अण्णाभाऊ साठे महामंडळ तसेच महात्मा फुले महामंडळांना राज्य सरकार निधी देत नसल्याने मागासवर्गीय समाजावर अन्याय होत असल्याचा आरोप केला. खरे तर स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे भीमशक्ती व शिवशक्ती एकत्र यावी असे स्वप्न होते. मात्र या शिवसेनेने स्व. बाळासाहेब यांच्या विचारांच्याविरोधात आघाडी करून राष्ट्रवादी पक्षाला बळ दिले असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली..
□ वाईन विक्रीला आरपीआयचा विरोध
राज्य सरकारकडून किराणामाल दुकानान वाईन विक्रीचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्राची संस्कृती बदनाम करण्याचा प्रयत्न राज्य सरकार करीत आहे. किराणा, मॉलमध्ये वाईन विक्रीला रिपब्लिकन पार्टी आफ इंडियाचा विरोध असल्याचेही रामदास आठवले यांनी यावेळी सांगितले.