श्रीपूर : महाळूंग श्रीपूर नगरपंचायतीच्या निवडणुकीतून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवाराने नामदेव इंगळे यांनी माघार घेतल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळेच स्थानिक आघाडीच्या लक्ष्मी चव्हाण बिनविरोध नगराध्यक्ष होण्याचा मार्ग मोकळा झाला.
राष्ट्रवादीच्या उमेदवाराने माघार घेतल्यामुळे स्थानिक आघाडीच्या उमेदवार लक्ष्मी अशोक चव्हाण या भिमराव रेडे पाटील स्थानिक पॅनलवर रिपाइं युती आहे. या युतीमधून रिपाइंकडून आघाडीतून लक्ष्मी चव्हाण या निवडून आल्या आहेत. त्यांचा बिनविरोध निवडीची केवळ औपचारिकता उरली आहे.
१७ सदस्य असलेल्या या नगरपंचायतीमध्ये स्थानीक आघाडीचे नऊ सदस्य निवडून आले आहेत. NCP withdraws from Mahalung Sreepur mayoral election; Local leader Lakshmi Chavan will be the unopposed mayor
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सहा सदस्य, तर कॉंग्रेस व भाजपचा प्रत्येकी एक सदस्य विजयी झाले आहेत. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी विकास आघाडीने लक्ष्मी चव्हाण यांचा व राष्ट्रवादी कॉंग्रेसने नामदेव इंगळे यांचा उमेदवारी अर्ज भरला होता. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख होती. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार नामदेव इंगळे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे लक्ष्मी चव्हाण यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.
उद्या शुक्रवारी (दि.१८) नगराध्यक्ष निवडीची प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानंतर उपनगराध्यक्ष पदाची निवड होणार आहे. या पदावर सुध्दा स्थानिक आघाडीच्या उमेदवाराची वर्णी लागणार आहे. हे आज स्पष्ट झाले आहे. स्थानिक आघाडीचे नेते नानासाहेब मुंडफणे व भिमराव रेडे पाटील यांच्या समन्वयातून उपनराध्यक्ष पदाचा उमेदवार निश्चित होण्याची शक्यता आहे. स्थानिक आघाडीने नगराध्यक्ष पदासाठी रेडे पाटील गटाचा उमेदवार दिला आहे. त्यामुळे उपनगराध्यक्ष पदासाठी नानासाहेब मुंडफणे गटाला संधी मिळू शकते.