अक्कलकोट : ते तिघेही कर्नाटकातील राहणारे. अंत्यविधीसाठी ते अक्कलकोट तालुक्यातील नागनहळ्ळीला आले होते. अंत्यविधी उरकून दुःखी मनाने घरी परत जाताना समोरून यमदूत बनून ट्रॅक्टर आला आणि थेट मोटारसायकलवर चढला. क्षणार्धात मोटारसायकलवरील आईवडिलांसह मुलगा गार झाले. अंत्यविधीसाठी आलेल्या नातेवाईकांवर यांच्या अंत्यविधीसाठी जाण्याची वेळ आली.
दुधनी (ता.अक्कलकोट) येथील म्हेत्रेनगर तांडा समोर मंगळवारी (ता. १५) रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास मोटारसायकल ला समोरून टँक्टरने जोरात धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकल वरील आई, वडिल व मुलगा असे तीन जणांचा मृत्यु झाला.
कर्नाटकातील अर्जुनगी ता.अफझलपूर जि.कलबुरगी येथील सर्व मयत असुन नागनहळ्ळी ता.अक्कलकोट येथे आज्जी वारल्याने अंत्यविधी करिता आले होते. अत्यंविधी करून परत जाताना काळाने घाला घातला. धोंडीराम गोपू जाधव (वय ४६ वर्षे) पत्नी संगिता धोंडीराम जाधव (वय ३८) व मुलगा अभिषेक घोंडीराम जाधव (वय २१ वर्ष, सर्व राहणार अर्जुनगी तांडा ता.अफझलपूर, कर्नाटक) असे अपघातातील मयतांची नांवे आहेत. याची दक्षिण पोलीस स्टेशनमध्ये टँक्टर चालकाविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. चालक अपघात झाल्यावर पळून गेला. टँक्टर, मोटारसायकल जप्त केले आले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
याबाबत पोलीस सुत्राकडुन मिळालेली अधिक माहिती अशी, मंगळवारी रोजी रात्री पावाणेदहा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी व त्यांचे नातेवाईक
नागनहळ्ळी येथे आज्जी मयत झाल्याने अंत्यविधी करुन घरी परत अर्जुनगी (ता. अफजलपुर जि. कलबुरगी) कडे जात असताना फिर्यादी हे त्याच्या मोटारसायकल आईसह होते तर सोबत नातेवाईक धोंडीराम जाधव, पत्नी संगिता, व मुलगा अभिषेक असे त्यांची मोटारसायकलवरुन जात असताना दुधनी म्हेत्रे नगर तांडा येथे आले असता समोरुन लाल रंगाचे ट्रॅक्टरच्या अज्ञात चालकाने अविचाराने, हयगयीने, बेदरकारपणाने चालवली. मोटारसायकलीस समोरुन जोरात धडक देवुन त्यात धोडीराम गोपु जाधव त्यांची पत्नी संगिता धोंडीराम जाधव व मुलगा अभिषेक धोंडीराम जाधव यांना गंभीर जखमी केले. त्यांना उपचारास दाखल न करता खबर न देता पळुन जावुन त्यांचे मृत्युस कारणीभुत झाला आहे. व धोंडीराम गोपु जाधव यांच्या मोटारसायकलची नुकसानीस कारणीभूत झाला म्हणून गुन्हा दाखल झाला.
फिर्याद मानसिंग रेसिंग चव्हाण (वय-२७ वर्ष, रा-अर्जुनगी तांडा ता. अफजलपुर जि. कलबुरर्गी ) यांनी दिली. घटनास्थळाला उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर, पोलीस निरीक्षक प्रदिप काळे, पोसई छबु बेरड यांनी पाहणी केली. अधिक तपास पोसई छबु बेरड हे करीत आहेत.