अहमदाबाद : २००८ मधील गुजरातच्या अहमदाबाद साखळी बाँबस्फोट प्रकरणात गुजरातमधील विशेष कोर्टाने आज दोषींना कठोर शिक्षा सुनावली आहे. एकूण ४९ दोषींपैकी ३८ जणांना फाशीची शिक्षा देण्यात आली आहे. तर इतरांना मरेपर्यंत जन्मठेप सुनावण्यात आली आहे. अहमदाबाद येथे २० ठिकाणी झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी ९००० पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. दरम्यान या स्फोटांमध्ये ५६ जणांचा मृत्यू झाला होता.
गुजरातमधील अहमदाबादमध्ये २००८ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी दोषींना शिक्षा सुनावण्यात आली आहे. सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश ए. आर. पटेल यांनी ४९ दोषींपैकी ३८ जणांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. इतर ११ जणांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
न्यायाधीश ए आर पटेल यांनी ८ फेब्रुवारीला निर्णय देताना सर्व ४९ आरोपींना दोषी ठरवले होते. कोर्टाने ७७ पैकी २८ आरोपींची सुटका केली होती. त्यामुळे या ४९ आरोपींना काय शिक्षा दिली.
जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यानुसार कोर्टाने आज निर्णय दिला असून शिक्षा सुनावली आहे. दोषींच्या शिक्षेवरील युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर विशेष कोर्टाने निकाल राखून ठेवला होता. सरकारी वकिलांनी सर्व दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली असताना दुसरीकडे आरोपींच्या वकिलांकडून कमीत कमी शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली होती. २००८ मध्ये अहमदाबादमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले होते. या स्फोटात ५६ लोकांचा मृत्यू झाला होता, तर २०० जण जखमी झाले होते. २६ जुलै २००८ रोजी हे बॉम्बस्फोट झाले होते. 2008 Ahmedabad Blast; 38 convicts hanged, read more
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
२६ जुलै २००८ ला झालेल्या २१ साखळी बॉम्बस्फोटांनी संपूर्ण संपूर्ण देशाला हादरवून सोडलं होते. याआधी २ फेब्रुवारीला याप्रकरणी निकाल येणार होता. पण न्यायमूर्ती ए आर पटेल यांना करोनाची लागण झाली. त्यामुळे ८ फेब्रुवारीपर्यंत तारीख पुढे ढकलण्यात आली होती. २६ जुलै २००८ रोजी फक्त एका तासात २१ बॉम्बस्फोट झाले होते. अहमदाबाद पोलिसांनी याप्रकरणी २० तर सूरत पोलिसांनी १५ गुन्हे दाखल केले होते.
त्यावेळेस नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यांना तात्काळ सर्व आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले होते. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग हे दुसर्याच दिवशी २७ जुलै रोजी अहमदाबाद दौऱ्यावर पोहोचले होते. तर पुढच्या १९ दिवस ३० दहशतवाद्यांना गुजरात पोलिसांनी अटक केली होती.
अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. तर सुनावणीदरम्यान ७ पेक्षा जास्त न्यायाधीश बदलले. गोध्रा हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी हा कट रचल्याचं म्हटलं जातं. तसंच या साखळी बॉम्बस्फोटाची जबाबदारी इंडियन मुजाहिद्दीनने घेतली होती.
२६ जुलै २००८ रोजी अहमदाबादमध्ये संध्याकाळी ६.४५ वाजता पहिला बॉम्बस्फोट झाला. मणिनगरमध्ये हा स्फोट झाला. मणिनगर हा तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ होता. यानंतर ७० मिनिटं आणखी २० बॉम्बस्फोट झाले. या स्फोटांमध्ये ५६ जणांचा मृत्यू झाला असून २०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. २००२ मधील गोध्रा घटनेचा बदला घेण्यासाठी इंडियन मुजाहिद्दीनने हे बॉम्बस्फोट घडवून आणले होते.
दहशतवाद्यांनी टिफिनमध्ये बॉम्ब टाकून तो सायकलवर ठेवला होता. हे स्फोट गर्दीच्या आणि बाजारपेठेत झाले. इंडियन मुजाहिदीन (IM) आणि स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया (SIMI) यांच्याशी संबंधित दहशतवाद्यांचा या स्फोटांमध्ये सहभाग होता. स्फोटांच्या पाच मिनिटांपूर्वी दहशतवाद्यांनी वृत्तसंस्थांना एक मेलही पाठवला होता. ज्यामध्ये ‘तुम्हाला जे हवे ते करा, थांबवता येत असेल तर थांबवा.” असं लिहिलं होतं.
□ दोषींच्या नावांची यादी
जाहिद शेख
इमरान शेख
इकबाल शेख
समसुद्दीन शेख
जावेद शेख
आसिफ शेख
अतीक खिलजी
मेहदी अंसारी
सफीक अंसारी
रफीउद्दीन
आरिफ मिर्जा
कबूमुद्दीन
सिबिल मुस्लिम
सफदर नागोरी
हाफिज मुल्ला
साजिद मंसूरी
अफजल उस्मानी
सर्फुद्दीन इत्ती
मोहम्मद सादिक शेख
अकबर चौधरी
फजल दुर्रानी
नौसाद सैयद
अहमद बरेलवी
रफीक अफीदी
अमीन शेख
मोहम्मद मोबिन खान
मोहम्मद अंसार
ग्यासुद्दीन अंसारी
आरिफ कागजी
उस्मान
युनूस मंसरी
इमरान पठान
अबूबसर शेख
अब्बास समेजा
सैफू अंसारी
मोहम्मद सैफ शेख
जीशान शेख
जिया-उर-रहमान
तनवीर पठान
अबरार मनियार
शादुली करीब
तौसीफ पठान
मोहम्मद अली अंसारी
मोहम्मद इस्माइल
कमरुद्दीन
अलीम काजी
अनीक सैयद
मोहम्मद शकील