मुंबई : दहावी-बारावीच्या परीक्षा जवळ येऊन ठेपल्या आहेत. त्यातच या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. सुमित अरविंद पवार या विद्यार्थ्याने ही याचिका दाखल केली आहे. कोरोना संकटामुळे मागील वर्षभर शाळा अनियमित झाल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचा पुरेसा अभ्यास झालेला नाही, असंही यात म्हटलं आहे.
औरंगाबादमधील सुमित अरविंद पवार या विद्यार्थ्याने ही याचिका दाखल केली आहे. कोरोना काळात (Covid-19) विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर विपरीत परिणाम झाला आहे. विद्यार्थी तणावात आहेत. अशात शाळाही अनियमित झाल्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास झालेला नाही, यामुळे विद्यार्थ्यांवर परीक्षेचे दडपण आले आहे, असे कारण या याचिकेत देण्यात आले आहे. त्यामुळे दहावी आणि बारावीच्या नियोजित परीक्षा किमान दोन महिने पुढे ढकलण्यात याव्यात अशी याचिका त्याने कोर्टात दाखल केली आहे. X, XII exams postponed; Petition in court
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
कोरोना संकटामुळे मागील वर्षभर शाळा अनियमित झाल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचा पुरेसा अभ्यास झालेला नाही. आता मार्च महिन्यात परीक्षांच्या तारखा घोषित झाल्यामुळे विद्यार्थ्यांवर परीक्षेचे दडपणे आले आहे, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. त्यामुळे त्याने केलेल्या याचिकेत, दहावी-बारावीची परीक्षा शक्य असेल तर ऑनलाइन घेण्यात यावी अन्यथा अभ्यासक्रम पूर्ण न झाल्याने अभ्यास करण्यासाठी परीक्षा दोन महिने पुढे ढकलण्यात याव्यात, अशी विनंती करण्यात आली आहे.
तसेच 4 फेब्रुवारी रोजीच्या परीक्षेसंबंधीच्या अधीसूचनेला स्थगिती द्यावी आणि ती रद्द करावी, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे. याचिकेवर 22 फेब्रुवारी रोजी सुनावणी अपेक्षित आहे. या प्रकरणी ॲड. बाबासाहेब भाले हे याचिकाकर्त्याकडून काम पहात आहेत.
बारावीच्या लेखी परीक्षा 4 मार्चे ते 7 एप्रिल या कालावधीत घेण्यात येणार आहेत. बारावीच्या प्रात्यक्षिक, तोंडी आणि लेखी परीक्षा 14 फेब्रुवारी ते 3 मार्चपर्यंत होणार आहेत. तसेच दहावीची लेखी परीक्षा 15 मार्च ते 18 एप्रिल या कालावधीत होणार आहे. दहावीच्या प्रात्यक्षिक, तोंडी आणि लेखी परीक्षा 25 फेब्रुवारी ते 14 मार्च या कालावधीत होणार आहेत.