वाशिम : वाशिमच्या मंगरूळपीर तालुक्यातील निम्बी गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. चुकीचा पोलिओ डोस पाजल्यामुळे दोन महिन्याच्या बालिकेचा मृत्यू झाला. बालिकेला डोस दिल्यानंतर मेंदूचे काम करणे बंद झाले. त्यानंतर दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले असता उपचार दरम्यान बालिकेचा मृत्यू झाला. बालिकेला दिलेल्या लसीमुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप पालक केशव आडे यांनी आपल्या तक्रारीत केला आहे.
वाशिममध्ये चुकीचा पोलिओ डोस पाजल्यामुळे दोन महिन्याच्या बालिकेचा मृत्यू झाल्याचा आरोप बालिकेच्या पालकांनी केला आहे. मंगरूळपीर तालुक्यामधील निम्बी गावामध्ये 8 फेब्रुवारीला बालिकेला डोस दिल्यानंतर मेंदूचे काम करणे बंद झाले. त्यानंतर तात्काळ वाशिममधील एका खासगी दवाखान्यामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचार दरम्यान त्या बालिकेचा मृत्यू झाला. डोक्यात ताप शिरल्यामुळे मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. Two-month-old baby dies due to wrong polio dose
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
बालिकेला दिलेल्या लसीमुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप पालक केशव आडे यांनी आपल्या तक्रारीत केला आहे. त्यांनी तशी तक्रार मंगरूळपीर पोलिसात केली आहे. तसेच याबाबतची तक्रार आरोग्य आधिकरी यांच्याकडेही केली आहे. 8 फेब्रुवारीला बालिकेला पोलिओ डोस दिला. त्यानंतर त्याच रात्री बालिकेचे मेंदूच काम करणे बंद झाले, असे तक्रारीत म्हटले आहे. मुलीला एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. अधिक उपचारासाठी अकोला इथे हलवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. उपचार दरम्यान मृत्यू झाला.
याबाबत आरोग्य विभागाने बालिकेला दिलेल्या डोसबाबत आपले स्पष्टीकरण दिले आहे.
याबाबत आरोग्य विभागाने बालिकेला दिलेल्या डोसबाबत आपले स्पष्टीकरण दिले आहे. शासनाने सांगितलेल्या नियमाप्रमाणे लसीकरण करत आहोत. लसीकरण केल्यावर 24 तासात त्याचे परिणाम जाणवतात. मात्र तसे न होता दुसऱ्या दिवशी बालिकेची प्रकृती बिघडली आणि उपचारानंतर बालिका दगावली म्हणून दोष दिला जात आहे. परंतु लस दिल्याने असे काही झालेले नाही, असे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. तिच्यासोबत इतर ही मुलांना हा डोस दिला. मात्र दुसऱ्या मुलांना काहीच इन्फेक्शन झाले नाही. त्यामुळं हा मृत्यू पोलिओचा डोस झाला नसावा असे जिल्हा साथरोग आणि माता बालसंगोपन अधिकारी डॉ मोबिन खान यांनी सांगितलं आहे.