नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (20 फेब्रुवारी) निवडणूक प्रचारासाठी उत्तर प्रदेश येथील उन्नाव येथे आले होते. यावेळी मंचावरती मोदी यांना एक कार्यकर्ता श्रीरामांची मूर्ती भेट देण्यासाठी आला असता मोदींच्या पाया पडण्यासाठी पुढे सरसावला. मात्र यावेळी त्या कार्यकर्त्याची अडवणूक करत मोदीच त्याच्या पाया पडले. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावरती तुफान व्हायरल होत आहे.
अरुण यादव यांनी ट्विट केले की, ‘कार्यकर्त्याचे पाय फक्त मोदीच स्पर्श करू शकतात. याचे कारण असे की ज्याने श्रीरामाची मूर्ती दिली त्यांच्याकडून स्वत:चे पाया पडू देणे योग्य नाही. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, कार्यकर्त्याने आधी भगवान श्रीरामाची मूर्ती पीएम मोदींना भेट दिली आणि नंतर त्यांच्या पायाला हात लावू लागला तर हे पाहून पंतप्रधानांनी लगेचच त्यांना थांबवलं आणि स्वतःच त्यांच्या पाया पडू लागले.
Narendra Modi fell the foundation of the activist
एक कार्यकर्ता के पैर सिर्फ मोदीजी ही छू सकते है
वजह ये है कि श्रीराम की मूर्ति देने वाले से खुद के पैर नहीँ छुआ सकते pic.twitter.com/SiJQQrdC9s
— Arun Yadav 🇮🇳 (मोदी का परिवार) (@beingarun28) February 20, 2022
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक सभेला संबोधित करण्यासाठी उन्नाव येथे आले होते. यावेळी जिल्हाध्यक्ष अवधेश कटियार यांनी मोदींना भगवान श्रीरामाची मूर्ती भेट दिली. मूर्ती दिल्यानंतर अवधेश कटियार यांनी पीएम मोदींच्या पायाला स्पर्श केला. त्यानंतर पीएम मोदींनी अवधेश कटियार यांना यासाठी मनाई केली आणि शिष्टाचार म्हणून पंतप्रधानांनी स्वतः अवधेशच्या पायाला स्पर्श केला.
व्हिडिओमध्ये दिसणारे उन्नाव जिल्हाध्यक्ष अवधेश कटियार यांचं नुकतंच प्रमोशन केलं गेलं होतं. आधी ते भाजपचे उन्नावमध्ये जिल्हा महासचिव होते. मात्र निवडणुकीच्या आधी त्यांना जिल्हाध्यक्षाची जबाबदारी दिली गेली.
पंतप्रदानांच्या या कृत्याचे अनेकजण कौतुक करत आहेत. भाजप नेते अरुण यादव यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. हजारो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून व्हिडिओवर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.