पुणे : मी कोल्हापूर जिल्ह्यातील एका गावचा पाटील आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांच्यापेक्षा भयानक बोलू शकतो. पण त्यांना कळेल म्हणून तशी भाषा वापरणे ही माझी संस्कृती नाही, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं. तसेच सोमय्यांबाबत राऊत यांनी वापरलेली भाषा अत्यंत चुकीची आहे, असंही ते म्हणाले.
चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिले. संजय राऊत यांनी त्यांच्या शिवराळ भाषेचे समर्थन करताना समोरच्याला कोणती भाषा कळते, त्या भाषेत आपण बोलतो, असे सांगितल्याचे एका पत्रकाराने सांगितले व त्यावर प्रतिक्रिया विचारली. यावेळेस चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले.
तेलंगणचे मुख्यमंत्री मुंबईत आले व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना भेटून भाजपाविरोधी प्रादेशिक पक्षांची आघाडी तयार करण्याची चर्चा केली. I am Patil, I can speak worse than Sanjay Raut- Chandrakant Patil
मी कोल्हापूर जिल्ह्यातील एका गावचा पाटील आहे. संजय राऊत यांच्यापेक्षा भयानक बोलू शकतो, पण त्यांना कळेल म्हणून तशी भाषा वापरणे ही माझी संस्कृती नाही ! pic.twitter.com/wtQWiC0F0c
— Chandrakant Patil (Modi Ka Parivar) (@ChDadaPatil) February 21, 2022
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
याविषयी प्रतिक्रिया विचारली असता चंद्रकांत पाटील म्हणाले की, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी असेच बिगरभाजपा पक्षांचे महागठबंधन तयार केले होते व आता भाजपाला बहुमत मिळणार नाही अशी हवा निर्माण केली होती. तरीही त्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपाच्या जागा वाढून पक्षाला ३०३ जागांसह पूर्ण बहुमत मिळाले.
२०२४ लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या जागा आणखी वाढतील. पण भाजपाविरोधी पक्षांनी आशा ठेवायला आणि प्रयत्न करायला हरकत नाही. शिवसेनेला गोव्याच्या गेल्या विधानसभा निवडणुकीत एकूण ७९२ मते मिळाली होती तरीही यावेळी त्यांनी सरकार स्थापनेचा दावा केलाच आहे.
दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत हे भाजप नेत्यांना उद्देशून वापरलेल्या आपल्या काही अत्यंत आक्षेपार्ह आणि शिवराळ शब्दांसाठी टीकेचे धनी होत आहेत. तरीही आपल्या शिवराळ भाषेचे समर्थन करताना संजय राऊत यांनी “समोरच्याला जी भाषा कळते, त्या भाषेत आपण बोलतो”, असेही पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे.