बंगळुरू : कर्नाटकमध्ये बजरंग दलाच्या २३ वर्षीय कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली आहे. रविवारी (ता. २०) रात्री शिवमोग्गा जिल्ह्यात हर्षा नावाच्या कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली. हत्येनंतर परिसरात तणाव असून जमावबंदी लागू करण्यात आली आहे. यावर निषेध व्यक्त केला जात आहे. राजकीय प्रतिक्रियाही व्यक्त होत आहेत.
हिजाबचा वाद शांत होत असताना कर्नाटकातील शिमोगात बजरंग दलाच्या कार्यकर्त्याच्यामुळे हिसेंची ठिणगी पडली आहे. कर्नाटकातील शिमोगामध्ये घडलेल्या या हत्याकांडाची देशभर चर्चा सुरू असून, शहरात या घटनेचे तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत.
सोशल मीडियावर हिजाबसंबंधी पोस्ट टाकल्यामुळे ही हत्या केल्याचं म्हटले जात आहे. मात्र कर्नाटकच्या गृहमंत्र्यांनी सध्या राज्यात सुरु असलेल्या हिजाब वादाशी याचा काही संबंध नसल्याचं म्हटलं आहे. त्यानंतर हर्षाच्या भावाने यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.
कर्नाटकमधील शिमोगामध्ये बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रविवारी २० फेब्रुवारी रोजी रात्री हा प्रकार घडला. हर्षा या २६ वर्षीय कार्यकर्त्याची हत्या झाली आहे. बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची हत्या झाल्यामुळे सध्या या भागामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. हर्षा गेल्या अनेक वर्षांपासून बजरंग दलाचा कार्यकर्ता होता.
कर्नाटक राज्यात सध्या भगवा आणि हिजाब यामध्ये वाद सुरू आहे. त्यातच थेट बजरंग दलाच्या कार्यकर्त्याच्या खुनामुळे हा तणाव आणखी वाढला आहे. बजरंग दलाच्या २६ वर्षीय हर्षा या कार्यकर्त्याची रविवारी संध्याकाळी चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. हल्ल्यानंतर लगेचच त्याला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्याचा उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या हत्येनंतर संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अद्याप या प्रकरणाबाबत फारशी माहिती समोर आलेली नाही.
हर्षा याची हत्या झाल्यानंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. हिजाब विरोधी पोस्ट केल्यामुळे त्याची हत्या झाल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांनी केला आहे. दरम्यान, शिमोगा शहरातील सीगेहट्टी परिसरात अनेक वाहने जाळण्यात आली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. ही हत्या कोणत्या कारणासाठी करण्यात आली, हा हल्ला कोणी केला, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे अस्पष्ट आहेत. Killing of Bajrang Dal’s Harsha while the hijab dispute was calming down
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
कर्नाटकात हिजाबवरुन वाद सुरु असून या वादात बजरंग दलाची देखील आक्रमक भूमिका आहे. त्यामुळे या हत्येनंतर या प्रकरणाला हिजाबच्या वादाशी जोडण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी केलेले नाही.
हर्षा हत्या प्रकरणात पोलिसांनी दिवसभरात तीन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांकडून आरोपींची धरपकड सुरू असतानाच या प्रकरणाचा तपास एनआयएकडे देण्याची मागणी आज करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे यांनी कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना पत्र लिहिलं आहे.
हिंसक घटनांनंतर शिमोगामध्ये कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. तसेच यापूर्वी शिमोगात काम केलेल्या राज्यातील ११२ पोलीस निरीक्षकांना आणि उपनिरीक्षकांना शहरात पाचारण करण्यात आलं आहे. पोलीस दलाबरोबरच आरएएफ जवानही तैनात करण्यात आले आहेत.
दुसरीकडे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी या घटनेचा निषेध करत नागरिकांना शांतता पाळण्याचं आवाहन केलं आहे. त्याचबरोबर भाजपचे नेते सुनील देवधर यांनीही घटनेचा निषेध केला आहे. हे अत्यंत दुर्दैवी आणि लज्जास्पद आहे. हिंदू युवक हर्षाच्या निर्घृण हत्येचा मी तीव्र निषेध करतो असं देवधर यांनी म्हटलं आहे.
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि जेडीएस नेते एचडी कुमारस्वामी म्हणाले की, अशी घटना घडू शकते असा इशारा त्यांनी आधीच दिला होता. “गेल्या आठवड्यात मी म्हटलं की असं होऊ शकतं, आता एका तरुणाची हत्या झाली आहे. काँग्रेस आणि भाजपा आता आनंदी होऊ शकतात कारण त्यांनी राज्यातील शांतता भंग केली आहे, असे कुमारस्वामी म्हणाले.