सोलापूर : सोलापुरात काल नाराज भाजपा नेते बिज्जू प्रधाने यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र या राजकीय प्रवेशाची सध्या वेगळ्याच विषयाची चर्चा सुरू आहे. या चर्चेचे कारण म्हणजे रात्री १२ वाजता हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
पक्षप्रवेश करण्यासाठी बिज्जू प्रधाने यांना तब्बल पाच तास वाट पहावी लागली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत हा रात्रीचा पक्षप्रवेश पार पडला. या प्रकारामुळे राजकारणात ‘उपस्थिती’ आणि ‘वेळे’ ला किती महत्व असते हे समजले आहे. रात्री जागरण, ओढाताण सहन करून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यक्रमास हजेरी लावली तर बिज्जू प्रधाने यांनीही मध्यरात्रीपर्यंत तब्बल पाच तास वाट पाहत पक्षप्रवेश करून राष्ट्रवादीचे नेते झाले.
आगामी सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सोलापूर भाजपाचे शहर सरचिटणीस बिज्जू प्रधाने राष्ट्रवादीत दाखल झाले आहेत. मात्र राष्ट्रवादीत प्रवेश करण्यासाठी त्यांना तब्बल पाच तास वाट पहावी लागली. जयंत पाटील पोहोचल्यानंतर रात्री १२ वाजता हा पक्षप्रवेश पार पडला आणि अखेर ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते झाले. सोलापुरातील बाळे येथे हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला. The party entry program was held in Solapur at midnight; I had to wait for five hours
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
■ का झाला उशिर, सांगितले कारण
सांगलीचे वीर जवान शाहिद रोमित चव्हाण यांच्यावर सोमवारी (ता. २१) अंत्यसंस्कार पार पडले. या अंत्यसंस्काराला जयंत पाटील यांना जावे लागले. त्यामुळेच जयंत पाटील यांना उशीर झाला आणि सोलापूर दौऱ्यातील सर्व कार्यक्रमांना विलंब झाला.
या विलंबाबद्दल अधिक बोलताना जयंत पाटील यांनी सांगितलं की, “भाजपातून काही प्रमुख कार्यकर्ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार होते. त्यांनी मला येथे येण्यासाठी विनंती केली होती. पण माझ्या मतदारसंघातील एका जवानाला वीरमरण आलं आहे. त्यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थिती लावल्याने मला येथे येण्यास उशीर झाला. ७ वाजताच हा कार्यक्रम होणार होता, पण उशीर झाल्याचे सांगितले.