नवी दिल्ली : भारताच्या १६ वर्षीय बुद्धीबळ खेळाडू रमेशबाबू प्रज्ञानंदने १६ खेळाडूंच्या ऑनलाइन रॅपिड चेस टुर्नामेंट एयरथिंग्स मास्टर्समध्ये नंबर वन मॅग्सन कार्सनला पराभूत केले. यामुळे कार्सनला हरवणारा प्रज्ञानंद तिसरा भारतीय ग्रँडमास्टर बनला आहे. याआधी कार्सनला विश्वनाथन आनंद आणि पी. हरिकृष्णा या दोन भारतीय बुद्धीबळपटूंनी पराभूत केले होते. प्रज्ञानंद आठव्या राउंडनंतर टुर्नामेंटमध्ये बाराव्या स्थानी राहिला.
ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदने यशस्वी चाल खेळत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या मॅग्नस कार्लसनला चेकमेट केले आहे. युवा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदने एअरथिंग्स मास्टर्स या ऑनलाईन जलद बुद्धिबळ स्पर्धेच्या आठव्या फेरीत मोठा उलटफेर केला आहे. काल काल सोमवारी खेळण्यात आलेल्या या सामन्यात प्रज्ञानंदने कार्लसनचा ३९ चालींमध्ये पराभव केला.
भारतीय ग्रँडमास्टरने या विजयातून आठ गुण मिळवले असून आठव्या फेरीनंतर तो संयुक्त १२ व्या स्थानी आहे. मागील फेऱ्यांमध्ये अपेक्षेप्रमाणे कामगिरी न करणाऱ्या कार्लसनवर प्रज्ञानंद विजय अनपेक्षित होता. याआधी त्याने फक्त लेव्ह अरोनियनविरुद्ध विजय नोंदवला होता. तर अनिश गिरी आणि क्वांग लिम विरूद्धचे सामने अर्निर्णीत राहीले होते. एरिक हॅन्सन, डिंग लिरेन, जॅन क्रिझिस्टॉफ डुडा आणि शाख्रियार मामेदयारोव यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. Indian chess player defeating Magnus Carlsen
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
काही महिन्यांपूर्वी नॉर्वेच्या कार्लसनकडून वर्ल्ड चॅम्पियनशिपचा सामना हरलेला रशियाचा इयान नेपोम्नियाचची १९ गुणांसह स्पर्धेत अव्वल स्थानावर आहे. २०१८ मध्ये प्रज्ञानंद १२ वर्षांचा असताना त्याने भारताचे दिग्गज बुद्धिबळपटू विश्वनाथ आनंद यांचा विक्रम मोडला होता. त्याने ग्रँडमास्टरचा किताब पटकावला होता.
रमेशबाबू प्रज्ञानंदा हा मूळचा तामिळनाडूचा आहे. वयाच्या सातव्या वर्षी त्याने जागतिक युवा बुद्धिबळ स्पर्धा जिंकली. त्यानंतर वयाच्या नऊव्या वर्षी त्याने १० वर्षांखालील विजेतेपद पटकावले होते. २०१८ मध्ये प्रज्ञानंदला ग्रँडमास्टरचा दर्जा मिळाला आहे. ग्रँडमास्टर बनणारा तो जगातील पाचवा सर्वात तरूण बुद्धिबळपटू आहे. मॅग्नस कार्लसनला पराभूत करणारा तो तिसरा भारतीय बुद्धिबळपटू ठरला आहे.
२०१६ मध्ये प्रज्ञानंदने यंगेस्ट इंटरनॅशनल मास्टर होण्याचा किताबही पटकावला आहे. २०१३ मध्ये प्रज्ञानंदने ८ वर्षांखालील जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकली होती. वयाच्या अवघ्या ७ व्या वर्षी एफआयडीआय मास्टरचा किताब जिंकला होता. बुद्धिबळातील प्रतिभावान मानल्या जाणाऱ्या अभिमन्यू मिश्रा, सेर्गेई करजाकिन, गुकेश डी आणि जावोखिर सिंदारोव यांच्यानंतर येणारा आर प्रज्ञानंदा हा पाचवा तरुण व्यक्ती आहे.
सचिन तेंडुलकरने प्रगानंदाचे कौतुक करताना लिहिले आहे, ‘प्रागसाठी ही एक अद्भुत अनुभूती असेल. तो फक्त सोळा वर्षांचा आहे आणि त्याने अत्यंत अनुभवी आणि मोठा खेळाडू मॅग्नस कार्लसन आणि तोही काळ्या मोहऱ्यांसह खेळून पराभूत केला आहे. हे खरोखर जादुई होते. भविष्यातील दीर्घ आणि यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा. तुम्ही भारताचा गौरव केला आहे.
What a wonderful feeling it must be for Pragg. All of 16, and to have beaten the experienced & decorated Magnus Carlsen, and that too while playing black, is magical!
Best wishes on a long & successful chess career ahead. You’ve made India proud! pic.twitter.com/hTQiwznJvX
— Sachin Tendulkar (@sachin_rt) February 21, 2022