नवी दिल्ली : भारताने वेस्ट इंडिजला वनडे आणि टी-२० मालिकेत धूळ चारली. यासह भारताने रोहितच्या नेतृत्वाखाली सलग तिसऱ्या मालिकेत निर्भेळ यश मिळवले आहे. भारताचा कर्णधार म्हणून पहिल्या २५ ट्वेंटी- २० सामन्यांत रोहित शर्माने सर्वाधिक २१ विजयांची नोंद केली आहे. तसेच घरच्या मैदानावर सर्वाधिक ट्वेंटी- २० सामने जिंकणारा रोहित हा भारताचा यशस्वी कर्णधार ठरला आहे. शिवाय भारताने टी-२० क्रमवारीत पहिला क्रमांक पटकावला.
भारतीय संघाने घरच्या मैदानावर एकदिवसीय मालिकेपाठोपाठ टी – २०तही पाहुण्या वेस्ट इंडिजला ३-० ने क्लीन स्वीप दिला. या मालिका विजयासोबतच भारताने टी-२० क्रिकेटमध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर मजल मारली आहे. जवळपास सहा वर्षांनंतर हे घडले आहे, जेव्हा टीम इंडियाला टी-२० मध्ये नंबर वन स्थान मिळाले आहे.
यापूर्वी, महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला २०१६ मध्ये शेवटच्या वेळी हे स्थान मिळवता आले होते. याआधी भारतीय संघ १२ फेब्रुवारी २०१६ ते ३ मे २०१६ या कालावधीत टी-२० क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर होता. त्यानंतर महेंद्रसिंग धोनी संघाचा कर्णधार होता, त्यानंतर कर्णधारपद विराट कोहलीच्या हातात आले. विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ दीर्घकाळ कसोटी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर राहिला, मात्र टी-२० मध्ये त्याने हा मुकुट मिळाला नाही. The Indian team became number one; Rohit is a successful captain of India
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
भारताच्या खात्यात २६९ रेटिंग गुण झाले आहेत. तर इंग्लंडचेही २६९ रेटिंग गुण आहेत. मात्र त्यांचे एकूण गुण हे १०,४८४ तर इंग्लंडचे एकूण गुण १०,४७४ असल्याने त्यांची दुसऱ्या स्थानी घसरण झाली आहे.
त्यांच्यापाठोपाठ पाकिस्तान (२६६) तिसऱ्या, न्यूझीलंड(२५५) चौथ्या आणि दक्षिण आफ्रिका (२५३) पाचव्या स्थानी आहे.
ऑस्ट्रेलियाने नुकतीच श्रीलंकेविरुद्धची मालिका ४-१ अशा फरकाने जिंकल्याने ते २४९ रेटिंग गुणासह सहाव्या क्रमांकावर आहेत. त्यानंतर अनुक्रमे वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेशचा नंबर लागतो.
न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत रोहित शर्माने पूर्णवेळ कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारली, ज्यामध्ये भारताने ३-० असा विजय मिळवला. आता वेस्ट इंडिजविरुद्धची टी-२० मालिकाही भारताने ३-० अशी जिंकली आहे. रोहित शर्मा टी-20 इतिहासातील भारताचा तिसरा सर्वात यशस्वी कर्णधार बनला आहे.
टी-२० फॉर्मेटमध्ये टीम इंडियाने सलग ९ सामने जिंकले आहेत. आता भारतासमोर श्रीलंकेचे आव्हान असेल. भारतीय संघ श्रीलंकेविरोधात टी-२० मालिकेत तीन सामने खेळणार आहे. पहिला सामना २४ फेब्रुवारी रोजी कोलकाता येथे होणार असून, २६ आणि २७ फेब्रुवारी रोजी अनुक्रमे दुसरा व तिसरा सामना होणार आहे.