नवाब मलिकांचा राजीनामा घेतला जाणार नाही, ठाकरे सरकारचा निर्णय
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसनं नवाब मलिक यांच्या अटकेवर आपली भूमिका मांडली. छोट्या आरोपांवर तसेच खोटे आरोप केल्यामुळे अटक झाल्यानंतर राजीनाम्याची गरज नाही, असं पक्षाकडून सांगण्यात आलंय. त्यामुळे मलिक यांचा राजीनामा घेतला जाणार नाही असं समजतंय. तसेच खोट्या आरोपांवर जर अटक होत असेल तर अशा पद्धतीनं मंत्र्यांचे राजीनामे आपण घेणार का? उठसूट कोणीही आरोप केले तर आपण राजीनामे घ्यायचे का?, असं पक्षाने म्हटलं.
ज्या आरोपांमध्ये नवाब मलिकांना अटक दाखवण्यात आली आहे. ते आरोपच मुळात खोटे आहेत. अनेक वर्षांपूर्वी जी जमिन खरेदी करण्यात आली, त्याचा या प्रकरणाशी संबंध नाही. त्याचबरोबर ज्या पद्धतीनं त्यांचा दाऊद गँगशी संबंध जोडण्यात येतो आहे. या आरोपांमध्येही तथ्य नाही. त्यामुळं जर खोटे आरोपांवर जर अटक होत असेल तर अशा पद्धतीनं आपल्या मंत्र्यांचे राजीनामे आपण घेणार का? उटसूठ कोणीही आरोप केले तर आपण राजीनामे घ्यायचे का? अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसनं मांडली आहे.
याबाबत राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांमध्ये चर्चाही होणार आहे. शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक येथील निवासस्थानी सध्या राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक सुरु आहे. NCP: No need for Malik’s resignation; BJP: Bhangarwala’s correct program
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
यामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छगन भुजबळ हे देखील हजेरी लावणार आहेत. जयंत पाटील यांनी देखील आपला दौरा अर्धवट सोडला असून ते मुंबईत परतत आहेत. हे मंत्री आणि नेते नंतर मुख्यमंत्र्यांशी याबाबत चर्चा करणार आहेत. त्यानंतरच नवाब मलिकांबाबत अंतिम निर्णय होणार असल्याचे वृत्त आहे.
राज्याचे मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला जाणार नाही, अशी भूमिका ठाकरे सरकारने घेतली आहे. मलिक यांचा राजीनामा घेण्याचा प्रश्नच नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी महत्त्वाच्या बैठकीनंतर स्पष्ट केले आहे. दरम्यान मलिक यांना ईडीने आज अटक केली आहे. दहशतवादी दाऊद इब्राहिम मनी लाँड्रिंग प्रकरणी मलिक यांच्यावर कारवाई करण्यात आली.
दरम्यान, या अटकेच्या पार्श्वभूमीवर विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी माध्यमाना प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलंय की, ईडीच्या अधिकाऱ्यांना नवाब मलिक यांच्या विरोधात सकृत दर्शनी काय पुरावा आहे? हे न्यायालयाला पटवून द्यावे लागेल. आणि त्यानंतरच न्यायालय ईडी कस्टडी द्यावी अथवा नाही हे ठरवले जाईल, अर्थात तपास यंत्रणेने कोणत्या प्रकारचा पुरावा गोळा केला आहे. त्या पुराव्याच्या गुणवत्तेवर हे ED कस्टडी किंवा न्यायालयीन कस्टडी राहू शकते. न्यायालय कस्टडी मिळाली तर जामिनाचा मार्ग मोकळा होऊ शकतो, ED कस्टडी मिळाली तर मात्र काही दिवसासाठी इडी कस्टडी मध्ये त्यांना राहावे लागू शकते, असे उज्वल निकम यांनी मत नोंदवलं आहे.
नवाब मलिक यांच्या अटकेवरून भाजपातूनही प्रतिक्रिया येत आहेत. अतुल भातखळकर ट्वीटद्वारे म्हणाले, “भंगारवाल्याचा करेक्ट कार्यक्रम झाला.” यात त्यांनी नवाब मलिक यांना उद्देशून भंगारवाला म्हणाले. त्यानंतर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर त्यांना कॅबिनेट मंत्री राहण्याचा अधिकार नाही. मुख्यमंत्र्यांनी तातडीने नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यावा. अन्यथा आम्हाला आंदोलन करावं लागेल, असं पाटील म्हणाले.