Wednesday, May 25, 2022
सुराज्य डिजिटल
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

नवाब मलिकांना 3 मार्चपर्यंत ईडी कोठडी; राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक

Surajya Digital by Surajya Digital
February 23, 2022
in Hot News, महाराष्ट्र, राजकारण
1
नवाब मलिकांना 3 मार्चपर्यंत ईडी कोठडी; राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

मुंबई – राज्याचे मंत्री नवाब मलिक यांना 3 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. मलिक यांना आज अटक केल्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आले. भल्या पहाटे आज मलिक यांच्या घरी ईडीचे अधिकारी पोहोचले होते. दाऊद इब्राहिम मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने मलिक यांची जवळपास 8 तास चौकशी केली. त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले.

ईडीच्या कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर मलिक यांनी अगदी हसतमुखाने आणि हात उंचावत आपण पुढच्या लढाईसाठी तयार असल्याचे दाखवून दिले होते. प्रसारमाध्यमांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करताना मलिक यांनी ‘लढेंगे और जितेंगे’ असे म्हटले होते. दरम्यान, या सर्व घडामोडी घडत असताना मलिक यांच्या कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून सातत्याने ट्विट करण्यात येत होते. मलिक यांना अटक झाल्यानंतर त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी जे.जे. रुग्णालयात नेण्यात आले होते. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवाब मलिक चौकशीत अधिकाऱ्यांना सहकार्य करत नव्हते, त्यामुळेच त्यांना अटक करण्यात आली आहे.

नवाब मलिकांना पीएमएलए कोर्टानं अखेर आठ दिवसांची कोठडी सुनावली. त्यामुळं तीन मार्चपर्यंत ईडकडून मलिकांची कसून चौकशी केली जाणार आहे. नवाब मलिक यांच्यावरील आरोप अद्याप सिद्ध झालेले नाहीत त्यामुळं त्यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही, अशा शब्दांत मंत्री छगन भुजबळ यांनी महाविकास आघाडी सरकारची भूमिका पत्रकार परिषदेद्वारे स्पष्ट केली.

Enforcement Directorate arrests NCP leader and Maharashtra Minister Nawab Malik in connection with Dawood Ibrahim money laundering case pic.twitter.com/x4AJ0RqpxU

— ANI (@ANI) February 23, 2022

 

उद्या सकाळी महाविकास आघाडीचे मंत्री आणि नेते महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ आंदोलन करणार आहेत. नवाब मलिक यांच्यावरील ईडी कारवाई विरोधात हे आंदोलन करण्यात येणार आहे. तर संजय राऊत यांनीही ट्वीट केलंय. नवाब मलिक यांचा राजीनामा घेऊ नये.. लढत राहू आणि जिंकू. कंस आणि रावण सुध्दा मारले गेले…हेच हिंदुत्व आहे.. जय महाराष्ट्र! सिल्व्हर ओकवरील बैठकीनंतर शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा निवासस्थानी बैठकीसाठी गेल्याचे वृत्त आहे. Nawab Malik to ED custody till March 3; BJP is aggressive for resignation

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

■ मलिकांचा राजीनामा घ्यावा, अन्यथा आंदोलन; शरद पवारांचा नेहमीच समाजात जातीयवाद निर्माण करण्याचा प्रयत्न

मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जातीयवादावरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. पाटील म्हणाले, ‘समाजात जातीयवाद निर्माण करण्याचा शरद पवारांचा प्रयत्न नेहमीच राहिला आहे. कधी ते मराठे विरुद्ध नॉन मराठे असा विषय सुरू करतात तर कधी ते अल्पसंख्याक विरुद्ध नॉन अल्पसंख्याक असा वाद सुरू करतात. मुस्लिम समाजालाही हे माहीत आहे की हे सर्व मतांसाठी सुरू आहे. ‘

शरद पवार यांचा समाजामध्ये जातीवाद करण्याचा नेहमीच प्रश्न राहिला आहे, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात भाजप विरुध्द महाविकास आघाडी सरकार संघर्ष पेटला आहे. भाजप केंद्रीय यंत्रणांचा वापर करून सरकार पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत आहे. तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सरकार पाडण्याच्या तारखा जाहीर करत आहेत.

चंद्रकांत पाटील म्हणाले, महाविकास आघाडी सरकारचे नेते रांगेत आहेत. काही जात्यात गेले तर काही सुपात आहेत. कोठड्या तयार आहेत. उत्तर प्रदेशात सात मार्च रोजी शेवटचे मतदान झाले की, बहुधा कारवाई सुरू होईल. त्यातून पळता भुई थोडी होईल व त्यातून हे सरकार पडेल, असे आपले विश्लेषण आहे. असा अंदाज सामान्य माणूसही बांधू शकतो.

चंद्रकांत पाटलांना दिशा सलियानच्या मृत्यूचे राजकारण होत असल्याच्या आरोपाबाबत विचारणा करण्यात आली. यावर ते म्हणाले, याबाबतीत काहीही राजकारण होत नाही. सात मार्चनंतर सगळे पुरावे बाहेर येतील. दूध का दूध, पानी का पानी होईल. कोण गुंतले आहे आणि कोणाला तुरुंगात जावे लागेल? हे स्पष्ट होईल. सध्या त्यामुळेच उसने अवसान आणून शिवराळ भाषा वापरणे चालू आहे. दिवा विझण्यापूर्वी फडफडतो तसा हा प्रकार आहे.

पाटील म्हणाले, कॅबिनेट मंत्री म्हणून पदावर राहण्याचा नवाब मालिक यांना कोणताही नैतिक आणि कायदेशीर अधिकर नाही. त्यांनी आता तातडीने राजीनामा द्यावा अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करु. आता कशाची वाट पहाताय? असा सवालही त्यांनी मलिक यांना केला आहे.

महाविकास आघाडीतील इतर मंत्र्यांवरही आरोप करताना पाटील म्हणाले, एका मंत्र्यानं महिला अत्याचारप्रकरणी राजीनामा दिला आहे. तर दुसऱ्या एका मंत्र्याच्या दोन बायका आहेत जे हिंदू कोड बिलामध्ये बसत नाही. या सरकारने घटना पायदळी तुडवली याची 22 पानी नोट तयार आहे. अटकेनंतर नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया देताना ‘लढेंगे और जितेंगे’ अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यावर बोलताना पाटील म्हणाले, ज्या प्रकारची नवाब मलिकांची देहबोली आहे, याला आमच्याकडे ग्रामीणभाषेत कोडगेपणा म्हणतात.

■ मुख्यमंत्र्यांनी मलिकांचा राजीनामा घ्यावा, अन्यथा आंदोलन करु

#ChandrakantPatil #आंदोलन #मुख्यमंत्री #सुराज्यडिजिटल #CM #surajyadigital

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आली. त्यानंतर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर त्यांना कॅबिनेट मंत्री राहण्याचा अधिकार नाही. मुख्यमंत्र्यांनी तातडीने नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यावा. अन्यथा आम्हाला आंदोलन करावं लागेल, असं पाटील म्हणाले.

Tags: #NawabMalik #ED #custody #March #BJP #aggressive #resignation#नवाबमलिकांना #ईडी #कोठडी #राजीनामा #भाजप #आक्रमक
Previous Post

राष्ट्रवादी : मलिक यांच्या राजीनाम्याची गरज नाही; भाजप : भंगारवाल्याचा करेक्ट कार्यक्रम

Next Post

#पंढरपूर : १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचे २०० खाटांसाठी आर्थिक तरतूद करावी

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
#पंढरपूर : १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचे २०० खाटांसाठी आर्थिक तरतूद करावी

#पंढरपूर : १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचे २०० खाटांसाठी आर्थिक तरतूद करावी

Comments 1

  1. swiss audemars piguet royal oak offshore 26401 2 says:
    2 months ago

    327023 232248Aw, this became an really good post. In thought I would like to devote writing such as this moreover – taking time and actual effort to make a really very good article but exactly what do I say I procrastinate alot and by no indicates discover a way to get something completed. 460674

वार्ता संग्रह

February 2022
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28  
« Jan   Mar »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697