पंढरपूर : पंढरपुरातील १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचे २०० खाटांसाठी अर्थिक तरतूद करावी,अशी मागणी आमदार समाधान आवताडे यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. मागणी पूर्ण झाल्यास पंढरपूरची वाढती लोकसंख्या आणि तीर्थक्षेत्रामुळे येणा-या भाविकांना मिळणारी आरोग्य सेवा अधिक गतिशील होण्यास मदत होणार आहे.
पंढरपूर तालुक्यातील आरोग्य सेवा अधिकतम सक्षम करण्यासाठी व रुग्णांच्या सेवेसाठी पंढरपूर येथे अस्तित्वात असलेल्या १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचे २०० खाटांच्या सामान्य रुग्णालयात रूपांतर करून आवश्यक अर्थिक तरतूद करावी अशी मागणी पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचेकडे मागणी केली आहे.
पंढरपूर येथील १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचे २०० खाटांच्या सामान्य रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्याच्या प्रस्तावास तत्कालीन शासनाने नमूद केल्याप्रमाणे प्रशासकीय मान्यता दिली होती. Pandharpur: Financial provision should be made for 200 beds of 100 bed sub-district hospital
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
त्यानुसार शासनाने सार्वजनिक आरोग्य विभागाला सदर मागणी अनुषंगाने अंदाजपत्रक त्वरित सादर करण्यास सांगितले होते. प्रशासकीय मान्यतेनुसार तब्ब्ल पाच वर्षात अद्याप सार्वजनिक आरोग्य विभागाने शासनाकडे कोणत्याही पत्रव्यवहार केला नाही. त्यामुळे ही मागणी लालफितीमध्ये अडकून बसली आहे.
पंढरपूर शहर हे भारताच्या अध्यात्मिक शहरापैकी एक महत्त्वपूर्ण शहर आहे. दरवर्षी परमात्मा श्री विठ्ठल दर्शनासाठी लाखो वारकरी भाविक पंढरीत येतात. येणाऱ्या वारकरी भाविकांच्या आरोग्य सुविधा अन्वये सदर मागणी लवकरात – लवकर मार्गी लागणे अतिशय गरजेचे असल्याचे आ. समाधान आवताडे यांनी पत्रात म्हटले आहे.
या सर्व बाबींचा विचार करून पंढरपूर शहर व तालुक्यातील जनतेच्या प्रभावशाली आरोग्य सुविधेसाठी पंढरपूर येथील १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचे २०० खाटांच्या सामान्य रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्याच्या अंदाजपत्रकास मान्यता देऊन येणाऱ्या सन २०२२-२३ च्या अर्थसंकल्पमध्ये निधीची तरतूद करून आवश्यक निधी उपलब्ध करून देणेबाबत योग्य ती कार्यवाही व्हावी, असेही आ. समाधान आवताडे यांनी पत्रात नमूद केले आहे.