मुंबई : बारावीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात थोडा बदल करण्यात आला आहे. बारावीच्या परीक्षा ४ मार्चपासून सुरु होणार आहेत. पण बारावीचे ५ आणि ७ मार्चला होणारे पेपर आता ५ आणि ७ एप्रिलला घेण्यात येणार आहेत. प्रश्नपत्रिका घेऊन जाणाऱ्या एका टेम्पोला संगमनेर तालुक्यात आग लागली होती. त्यामुळे वेळापत्रकात थोडा बदल करण्यात आला. बाकीच्या पेपर नियोजनात कोणताही बदल झालेला नाही.
बोर्डाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार दोन पेपरमध्ये हा बदल करण्यात आला आहे. ५ मार्च रोजी होणारा हिंदीचा पेपर आता ५ एप्रिलला होणार आहे. तर सात मार्चला होणारा मराठीचा पेपर हा सात एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे. काल बुधवारी (२३ फेब्रुवारी) प्रश्नपत्रिका घेऊन जाणाऱ्या एका टेम्पोला पुणे-नाशिक महामार्गावर संगमनेर तालुक्यात जवळ आग लागली होती. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे बोर्डाने बैठक घेऊन या दोन विषयाचे पेपर पुढे ढकलले आहेत.
दहावी बारावीच्या पुणे बोर्डाच्या प्रश्नपत्रिका घेऊन जाणाऱ्या टेम्पोला चंदनापुरी घाटात मागच्या बाजूने ही आग लागली. या आगीमध्ये संपूर्ण प्रश्नपत्रिका जळून खाक झाल्या. त्यामुळे परीक्षा तोंडावर असताना प्रश्नपत्रिका जळाल्याने हे दोन पेपरची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. A slight change in the schedule of 12th standard examination due to burning of question papers
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
५ आणि ७ मार्च रोजी होणाऱ्या परीक्षांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. भाषा विषयांचे पेपर पुढे ढकलण्यात आले आहेत. इयत्ता बारावीची परीक्षा ४ मार्च रोजी सुरू होणार आहे. पण यातील ५ मार्च रोजी होणारा पेपर आता ५ एप्रिल रोजी, तर ७ मार्च रोजी होणारा पेपर ७ एप्रिल रोजी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
काल बुधवारी पुणे – नगर मार्गावर पुण्याच्या दिशेने येत असताना एका ट्रकला आग लागली होती. या ट्रकमध्ये बारावीच्या प्रश्नपत्रिका जळून खाक झाल्या होत्या. जळून खाक झालेल्या प्रश्नपत्रिका याच विषयांच्या असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे बारावीच्या वेळापत्रकात अंशत: बदल करण्याची नामुष्की बोर्डावर आली आहे.
५ मार्चला सकाळी हिंदी तर दुपारच्या सत्रात जर्मन, जपानी, चिनी आणि पर्शियन विषयाचे पेपर होणार होते. तर, ७ मार्चला सकाळच्या सत्रात मराठी, गुजराती, कन्नड, सिंधी,(अरेबिक, देवनागरी), मल्याळम, तामिळ, तेलुगु, पंजाबी, बंगाली, आणि दुपारच्या सत्रात उर्दू, फ्रेंच, अर्धमागधी, स्पॅनिश आणि पाली विषयाचा पेपर होणार होता. हे पेपर आता ५ एप्रिल रोजी होणार आहेत.
७ मार्चला सकाळच्या सत्रात मराठी, गुजराती, कन्नड, सिंधी, (अरेबिक, देवनागरी), मल्याळम, तामिळ, तेलुगु, पंजाबी, बंगाली, आणि दुपारच्या सत्रात उर्दू, फ्रेंच, अर्धमागधी, स्पॅनिश आणि पाली विषयाचा पेपर होणार होता. ते आता ७ एप्रिल रोजी होतील.