कोल्हापूर : महावितरण कार्यालयासमोर गेले दोन दिवस स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरु आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या धरणे आंदोलनाकडे सरकारने दुर्लक्ष केल्याने आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. संतप्त अज्ञात शेतकऱ्यांनी कागल येथील महावितरणचे कार्यालय पेटविले आहे. महावितरणचे कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय पेटवून दिले आहे.
शेतीसाठी दिवसा दहा तास वीज पुरवठा झाला पाहिजे या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे कोल्हापुरात महावितरण कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू आहे. संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन होत आहे.
दरम्यान या आंदोलनाकडे सरकारने दुर्लक्ष केल्याच्या भावनेतून अज्ञाताने कागल येथील महावितरणचे कार्यालय पेटविले. रात्री दोन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.
या आगीत काही कागदपत्रे जळाली आहेत. ‘शेतकर्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने संतप्त अज्ञात शेतकर्यांनी कार्यालय पेटवले’, असे ट्वीट शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
साक्षात ब्रम्हदेव आला तरी वीजबील माफी नाही अंस वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलं आहे. आता याप्रकरणी स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टींनी एक ट्वीट केलं आहे. Violent turn of Raju Shetty’s agitation, MSEDCL office set on fire
एवढा अहंकार बरा नव्हे ईडी ब्रम्हदेवापेक्षाही प्रभावी ठरणार नाही याची काळजी घ्या !@ANI pic.twitter.com/oqWi4h9ctf
— Raju Shetti (@rajushetti) February 24, 2022
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
या ट्वीटमध्ये ते म्हणतात, एवढा अहंकार बरा नव्हे, ईडी ब्रम्हदेवापेक्षाही प्रभावी ठरणार नाही याची काळजी घ्या, असा उपरोधिक टोला त्यांनी अजित पवार यांना लगावला आहे. मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर राष्ट्रवादीतील अनेकांनी भाजप सुडाचं राजकारण करत असल्याची टिका केली आहे. तर हा आरोप भाजपाच्या काही नेत्यांनी खोडून काढला आहे.
या संदर्भात राजू शेट्टी म्हणाले, ”शेतीसाठी दिवसा १० घंटे वीजपुरवठा मिळत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन मागे घेणार नाही. महावितरणच्या वीजनिर्मितीमध्ये साखर कारखान्यापेक्षाही मोठा घोटाळा आहे. तो लवकरच चव्हाट्यावर आणू. वीजनिर्मिती आस्थापनेत मंत्र्यांचे लागेबांधे आहेत. जनतेच्या पैशाची महाविकास आघाडी सरकारकडून लूट चालू आहे.”
महावितरणच्या कागल विभागीय कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालय पेटविण्याचा प्रकार घडला. कागल येथे राष्ट्रीय महामार्गालगत महावितरणचे हे कार्यालय आहे. कागल येथील छत्रपती शाहू कारखान्याच्या अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी पोहचवून आग आटोक्यात आणली. दरम्यान, पोलिस या घटनेचा तपास करत असल्याचे सांगितले .