मुंबई : दाऊद इब्राहिम मनी लाँड्रिंग प्रकरणात नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे. ते 3 मार्चपर्यंत ईडीच्या कोठडीत आहेत. त्यानंतर राजकीय सुडबुद्धीने केलेली ही कारवाई असल्याचा आरोप महाविकास आघाडीने केला आहे. तसेच याविरोधात आज मंत्रालय परिसरात महाविकास आघाडीने आंदोलन सुरू केले आहे. यामध्ये तिन्ही पक्षांचे मंत्री आणि नेते हजर आहेत. दरम्यान मलिक यांचा राजीनामा घेतला जाणार नाही, असेही सरकारने स्पष्ट केले आहे.
महाविकाआघाडीचे सर्व नेते मंडळी आज गुरूवारी मंत्रालयाजवळील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर केंद्र सरकार तपास यंत्रणेनेचा करत असलेला चुकीच्या वापराविरोधात शांतपणे आंदोलन करणार आहे. ईडीने मलिकांना आठ तासांच्या चौकशीनंतर अटक केली. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थान आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सिल्व्हर ओके त्यांच्या निवासस्थान बैठक बोलावण्यात आली होती. या दोन्ही बैठकीनंतर केंद्र सरकार विरोधात आंदोलन करून ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला.
आज सकाळी १० वाजता मंत्रालयाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ महाविकास आघाडी आंदोलन सुरू केले. तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते उपस्थितीत होते. सुरूवातीला उपमुख्यमंत्री अजित पवार आंदोलनस्थळी प्रथम पोहचले पोहचले. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, काँग्रेस नेते तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, शिवसेना नेते सुभाष देसाई सह नेत्यांनी हजेरी लावली. Protest against action against Nawab Malik, agitation in Mantralaya
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
काही वेळाने शिवसेनेचे नेते आणि मंत्री सुभाष देसाई, मनीषा कायंदे, सचिन अहिर, यामिनी जाधव, सुनील राऊत हे आंदोलनस्थळी पोहोचले. दक्षिण मुंबई विभाग प्रमुख आणि शाखाप्रमुख शिवसैनिक उपस्थित आंदोलनस्थळावर दाखल झाले आहेत.
महाविकास आघाडी सरकारच्या वतीने आंदोलन करण्यात येत असले तरी शिवसेनेचे नेते आणि मंत्री अद्यापही आंदोलन सही पोहोचलेले नाहीत याबाबत तर्कवितर्क लढवले जात असले तरी शिवसेनेचे नेते आणि मंत्री लवकरच आंदोलनस्थळी पोहोचतील अशी माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर टीका केली. ‘नवाब मलिक यांच्यावर अटक करण्याची कारवाई करण्यात आली. अशा प्रकारे सरकारमधील मंत्री, नेत्यांना अटक करून भाजपकडून महाविकास आघाडी सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजप विरोधात बोलणार्याना आदींची भीती दाखवली जाते,’ अशी टीका थोरात यांनी केली.
□ बहीण ईडीत दाखल
अटकेत असलेले मंत्री नवाब मलिक यांची भेट घेण्यासाठी त्यांची बहीण सईदा या ईडी कार्यालयात दाखल झाल्यात. यावेळी डॉ. सईदा खान म्हणाल्या की, माझ्या भावावर सरकार सूडबुद्धीने कारवाई करत आहे. कुठलीही प्रक्रिया पूर्ण न करता त्यांना ताब्यात घेतले होते. नवाब मलिक हे लढवय्ये आहेत. सत्य परेशान हो सकता, है लेकिन पराजित नही.
न्यायालयाकडून आपल्याला एकशे एक टक्का न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. काही झाले तरी देखील आम्ही लढा देऊ. हटणार नाही, हरणार नाही. चार महिन्यांपासून सगळ्यांना ठाऊक होते की, घरी ईडी येणार आहे. आम्ही लढा सुरू ठेवू, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. त्यांना ईडी कार्यालयात प्रवेश नाकारल्याचे वृत्त आहे.