सोलापूर : सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाच्या निवडणुकांचा निकाल आज जाहीर झाला आहे. मतदान झालेल्या 16 पैकी 16 जागांवर सत्ताधारी शेतकरी विकास आघाडी पॅनलने निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे. तर विरोधातील दूध संघ बचाव पॅनला एकही जागा जिंकता आली नाही.
राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांची सून वैशाली साठे यांचा पराभव झाला आहे. जिल्हा दूध उत्पादक संघाची निवडणूक यंदा चांगलीच चुरशीची झाली. सत्ताधारी शेतकरी विकास पॅनलला दूध संघ बचाव कृती समितीने आव्हान दिले होते. निवडणूक पार पारण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आबासाहेब गावडे यांनी काम पाहिले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष बळीराम साठे यांच्या सून वैशाली साठे या दूध संघ बचाव पॅनलच्या उमेदवार होत्या. त्यामुळे ही निवडणूक जास्तच प्रतिष्ठेची झाली होती. परंतु, आज लागलेल्या निकालात दूध संघ बचाव पॅनलच्या सर्वच उमेदवारांसह वैशाली साठे यांचाही पराभव झाला. बळीरामकाका साठे यांची एकाकी झुंज अपयशी ठरली. काका साठे यांना सत्ताधारी पॅनल मधून उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र अपेक्षा फोल ठरली. उतरत्या वयात 80 व्या वर्षी त्यांच्या सुनेचा पराभव हा जिव्हारी लागणार आहे.
जिल्हा दूध संघात 17 जणांचे संचालक मंडळ आहे. दुध संघाची निवडणूक टाळण्यासाठी ज्येष्ठ नेत्यांनी बैठका वर बैठका घेतल्या. मात्र या बैठका निष्फळ ठरल्या.
परंतु, ओबीसीमधून काँग्रेस नेते सुरेश हसापुरे यांनी माघार घेतली होती. त्यामुळे दीपक माळी यांची संचालक पदी बिनविरोध निवड झाली तर उर्वरित 16 जागांसाठी निवडणूक लागली होती. या 16 जागांसाठी 31 उमेदवार रिंगणात उतरले होते. आज शनिवारी सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत मतदान झाले. या वेळेत 316 मतदारांपैकी 313 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
Solapur Dudh Sangh: Dominance of the ruling Farmers Development Alliance
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
माळशिरस तालुक्याचा अपवाद वगळून सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये कार्यक्षेत्र असलेल्या जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघावर परत सत्ताधारी पॅनलने वर्चस्व मिळवले आहे.
प्रस्थापित मंडळींच्या पॅनेलची धुरा माढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे, मोहोळचे माजी आमदार राजन पाटील आणि बार्शीचे पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे आणि सध्या शिवसेनेचे नेते दिलीप सोपल यांच्यावर होती. या पॅनेलमधून आमदार बबनराव शिंदे यांनी त्यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे आणि दिलीप सोपल यांनी त्यांचे पुतणे योगेश सोपल यांची वर्णी लावली तसे त्यांचा विजयही झाला. त्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष बळीराम साठे यांनी आपल्या सुनेची वर्णी लावली. पण त्यांचा पराभव झाला.
● उमेदवार आणि पडलेली मते
◇ दूध संघ बचाव सर्वसाधारण गटातील उमेदवार पडलेली मते
अनिल अवताडे 90
सुवर्णा इंगळे 88
कांचन घाडगे 84
भाऊसाहेब धावणे 88
पार्वतीबाई पाटील 79
संजय पोद्दार 81
सुनीता शिंदे 84
◇ शेतकरी विकास पॅनल सर्वसाधारण गटातील उमेदवार पडलेली मते
बबनराव आवताडे 189
मनोज गरड 189
अलका चौगुले 202
बाळासाहेब माळी 227
राजेंद्र मोरे 218
संभाजी मोरे 214
विजय येलपले 211
मारुती लवटे 226
औदुंबर वाडदेकर 218
रणजितसिंह शिंदे 207
वैशाली शेंबडे 199
योगेश सोपल 201
◇ महिला प्रतिनिधी दूध संघ बचाव उमेदवार
संगीता लोंढे 67
वैशाली साठे 144
◇ शेतकरी विकास पॅनलचे महिला उमेदवार
निर्मला काकडे 160
छाया ढेकणे 206
◇ भटक्या विमुक्त जाती उमेदवार
राजेंद्रसिंह पाटील 235
रमजान नदाफ 74
◇ अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधी उमेदवार
मंगल केंगार (दूध संघ बचाव) 80
जयंत साळे (शेतकरी विकास) 228
59769 971336Hello! Someone in my Facebook group shared this web site with us so I came to appear it more than. Im surely enjoying the information. Im book-marking and will probably be tweeting this to my followers! Outstanding blog and superb style and style. 291945